सोलापूर माढा लोकसभा मतदारसंघात राष्टÑवादी काँग्रेसचे विजयसिंह मोहिते-पाटील यांनी थोडक्या मतांनी का होईना मिळविलेला विजय हा त्यांच्या ‘बॅकफूट’वरून राजकारणात स्थिरावणारा ठरला आहे. यामुळे मोहिते-पाटील घराण्याला चांगले बळ मिळाले आहे. विशेष म्हणजे राष्टÑवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा या मतदारसंघातील वारसदार म्हणून विजयसिंह पुढे आले आहेत. खरंतर सुरुवातीपासूनच या मतदारसंघात राष्टÑवादीमध्ये उमेदवारीवरून तिढा निर्माण झाला होता, पण शरद पवारांनी विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याने पवारांचे या मतदारसंघातील वारसदार म्हणून राष्टÑवादीचे नेते कामाला लागले. आणि समोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत आणि सख्खे बंधू प्रतापसिंह मोहिते-पाटील यांनी आव्हान दिलेले असतानाही विजयसिंहांनी थोड्या फरकाने विजय मिळवून हा मतदारसंघ राष्टÑवादी काँग्रेसच्या ताब्यात ठेवण्यात यश मिळविले आहे. जिल्ह्याच्या व राज्याच्या राजकारणात जवळून अभ्यास, जिल्ह्यातील सहकारी संस्था उभारणीत दिलेले मोठे योगदान, शांत व संयमी स्वभाव या गोष्टी विजयसिंह यांना विजय मिळविण्यात फायद्याच्या ठरल्या आहेत. शरद पवारांच्या आदेशामुळे जिल्ह्यातील राष्टÑवादीचे आमदार आणि नेत्यांनी विजयसिंहांचा जोमाने प्रचार केला. शिवाय शेकापचे आमदार गणपतराव देशमुख यांनी त्यांना दिलेले बळ, काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांना दिलेली चांगली साथ, प्रचारात एकसूत्रीपणा आणि सक्रियता या गोष्टी त्यांच्या विजयात सरस ठरल्या आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत यांनी महायुतीतर्फे निवडणूक लढवून विजयसिंहांची चांगलीच दमछाक केली होती. ऊसदर आंदोलनामुळे अख्ख्या मतदारसंघात परिचय असूनही अपेक्षेप्रमाणे याचा त्यांना फायदा झाला नाही. मतदारसंघाबाहेरील उमेदवार असल्याचा मोठा फटका येथे सदाभाऊंना बसला. महायुतीत असताना या मतदारसंघातील मित्रपक्षांनी प्रचारात म्हणावी तशी सक्रियता दाखविली नसल्याचा फटका त्यांना बसला. या मतदारसंघातील शेतकर्यांचा पाणीप्रश्न सदाभाऊंना आक्रमकपणे मांडता आला नाही.
-------------------
या कारणांमुळे मिळाला विजय विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या विजयासाठी राष्टÑवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व राष्टÑवादीच्या नेत्यांनी जातीने लक्ष घातले होते. शरद पवारांचे या मतदारसंघात वारसदार म्हणून विजयसिंहांकडे पाहिले गेले. सातारा जिल्ह्यातील माण, फलटण, खटावमधील काँग्रेस नेत्यांनी सुरुवातीला नाराजी दर्शविली खरी, पण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वत: लक्ष घालून काँग्रेस नेत्यांमधील नाराजी दूर करण्यात यश मिळविले. सुरुवातीला नेत्यांमध्ये उमटलेली नाराजी दूर करण्यात यश मिळविता आले. यासाठी माजी खा. रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी जातीने या नेत्यांच्या घरी जाऊन त्यांची नाराजी दूर करून त्यांना प्रचाराच्या प्रवाहात आणले.
-------------
जिंकल्याचे कारण राष्टÑवादीच्या नेत्यांची प्रचारात सक्रियता मतदारसंघात पवारांनी जातीने घातलेले लक्ष काँग्रेस, शेकापची मिळालेली चांगली साथ प्रचारात सक्रियता
---------------------
हरल्याचे कारण मतदारसंघाबाहेरील उमेदवार केवळ शेतकर्यांचेच कैवारी असल्याचा ठपका महायुतीतील मित्रपक्षांची म्हणावी तशी साथ नव्हती