ग्रामपंचायत निवडणुकीत श्री सिद्धेश्वर ग्रामविकास आघाडीचे १५ पैकी १२ सदस्य विजय होऊन सत्ताधारी विरोधी श्री विमलेश्वर आघाडीचा पराभव केला होता. ग्रामपंचायत आरक्षण सर्वसाधारण जागेसाठी खुले होते. त्यामुळे सरपंच पदासाठी विजय पवार यांचा तर उपसरपंच पदासाठी नाना भोसले यांची अर्ज दाखल केले. यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी बी. डी. वाहेकर यांनी या दोघांची बिनविरोध निवड जाहीर केली. तलाठी डी. आर. नरळे व ग्रामविकास अधिकारी मधुकर माने यांनी सहकार्य केले.
निवडीनंतर सरपंच व उपसरपंच तसेच नूतन सदस्यांचा सिद्धेश्वर विकास आघाडीचे प्रमुख पोपट अनपट, विष्णूपंत हुंबे, कैलास भोसले, राजेंद्र जगताप मच्छिंद्र अनपट यांनी सत्कार केला. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त होता. कोरोना सर्व नियमांचे पालन करीत ही निवड पूर्ण झाली. नामदेव कांबळे, शैला किर्ते, रंजना कोळी, नमिता अनपट,
विकास अनपट, व
छाया लोंढे ,नाना भोसले, उत्तम काळे, संजीवनी भोसले
मधून विजय पवार, ललिता हुलगे, मंजूशा काळे असे एकूण १२ ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
फोटो
२५बेंबळे०१
बेंबळेच्या सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडीनंतर सर्व सदस्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पोपट अनपट, विष्णू हुंबे, कैलास भोसले आदी.