सोलापूर : कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे सुरू करण्यात आलेल्या बेदाणा लिलावात गुरुवारी या हंगामातील विक्रमी म्हणजे १७१ रुपये प्रति किलो भाव मिळाला. कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे २४ फेब्रुवारीपासून बेदाणा लिलावास सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला दररोज सुमारे दहा टन बेदाण्याची आवक होत होती. यंदाच्या हंगामात सुरुवातीपासून बेदाण्याला १५0 ते १६0 रुपये प्रतिकिलो भाव सुरू आहे. आता सर्वत्र बेदाणा शेडचे काम वाढल्याने दररोज १५ ते २0 टनची आवक सुरू झाली आहे. बाजार समितीतर्फे दर शनिवारी बेदाण्याचे लिलाव केले जात होते. पण व्यापाºयांची मागणी लक्षात घेऊन ८ मार्चपासून लिलाव वेळेत बदल करण्याचा निर्णय सचिव मोहन निंबाळकर यांनी घेतला. त्याप्रमाणे आज पहिल्याच दिवशी झालेल्या लिलावात व्यापाºयांचा चांगला प्रतिसाद मिळाला. दक्षिण सोलापुरातील आहेरवाडी येथील शेतकरी दयानंद हल्ले यांच्या सुपर क्वालिटीच्या बेदाण्याला विक्रमी म्हणजे १७१ रुपये किलो भाव मिळाला. उत्तम बेदाणा काढल्याबद्दल रक्षा ट्रेडिंग कंपनीचे संचालक शिवानंद शिंगडगाव यांनी त्यांचा सन्मान केला. बेदाणा लिलावास यावर्षी सुरुवातीपासून चांगला प्रतिसाद मिळत आहे. दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, उत्तर सोलापूर, मोहोळ येथील शेतकरी बेदाणा विक्रीसाठी बाजार समितीकडे आणत आहेत. बेदाणा खरेदीसाठी नाशिक, सांगली, तासगाव, पंढरपूर, विजापूर येथील व्यापारी येत आहेत. व्यापाºयांच्या मागणीवरूनच बेदाणा लिलावाचा दिवस बदलला आहे. पंडित अंबारे, शिवानंद शिंगडगाव, अरुण बिराजदार आणि विश्वजीत हेले या चार अडत्यांकडे सध्या बेदाण्याचे खरेदी-विक्री व्यवहार सुरू आहेत. सोलापूर जिल्ह्यात सध्या बेदाणा निर्मितीला वेग आला आहे. आवक आणखी वाढणार आहे. यंदा चांगल्या हवामानामुळे उच्च प्रकारच्या बेदाण्याची मोठ्या प्रमाणावर निर्मिती झाल्याचे दिसून येत आहे. बेदाण्याला चांगला भाव मिळत असल्यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. सोलापुरातील बेदाणा लिलावातून शेतकºयांचे समाधान होत आहे. बाजार समितीतर्फे लिलावाचा दिवस सोयीचा केला आहे. सांगली-तासगावच्या धर्तीवर दहा रुपयांनी जादा भाव सोलापूर जिल्ह्यातील शेतकºयांंना मिळत आहे. - पंडित अंबारे, अडत दुकानदार
सोलापूर बाजार समितीत बेदाण्याला विक्रमी भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2018 1:19 PM
१७१ रुपये प्रति किलो: आता दर गुरुवारी होणार सोलापूर बाजार समितीत लिलाव
ठळक मुद्देकृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे २४ फेब्रुवारीपासून बेदाणा लिलावास सुरुवातसुरुवातीला दररोज सुमारे दहा टन बेदाण्याची आवक होत होती बेदाण्याला १५0 ते १६0 रुपये प्रतिकिलो भाव सुरू