शीतलकुमार कांबळे, सोलापूर : ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धेश्वर यात्रा ही काही दिवसांवर आली आहे. शहर व जिल्ह्यामध्ये यात्रेचा उत्साह पाहायला मिळत आहे. या उत्साहात विशेष मुले देखील सहभागी होत आहेत. त्यांनी अगदी आखीव-रेखीव असा नंदीध्वज तयार केला आहे.
ऑल इज वेल सामाजीक बहुउद्देशीय संस्था संचलित एसईपीडीसी स्पेशल एज्यूकेशन स्कूलच्या माध्यमातून ही विशेष मुले नंदीध्वज तयार करत आहेत. नंदीध्वज तयार करण्यासाठी या मुलांना १५ दिवसांचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले. हे १५ दिवस मुलांनी आनंदाने प्रशिक्षण घेतले. आता नंदीध्वज तयार करण्याचा त्यांचा चांगलाच सराव झाला आहे.
काठीला स्वच्छ करुन त्याला रंग देण्यापर्यंतचे काम ही मुले स्वता करतात. बाजारातून आणलेले कापडाचे फूल तयार करतात. अतिशय कल्पकरित्या ही फुले नंदीध्वजाला लावत आहेत. यासाठी त्यांचे शिक्षक मुलांना मार्गदर्शन करत आहेत. शाळेत असणार १० मुले आकर्षक असा नंदीध्वज तयार करत आहेत.