अनगर : येथील कै. शंकरराव बाजीराव पाटील माध्यमिक विद्यालयात अकरावी, बारावीचे शिक्षण घेतलेली विद्यार्थिनी मोनाली पारेकर या आज डॉक्टर होऊन अनगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झाल्या. यानिमित्त माजी आमदार राजन पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी राजन पाटील यांनी गावची निष्ठेने व प्रामाणिकपणे सेवा करण्याचे आवाहन केले. या प्रसंगी डॉ. मोनाली पारेकर यांनी कोरोनासारख्या कठीण काळात संधी मिळाल्याचे सांगितले.
या प्रसंगी डॉ. मोनाली यांचे वडील बिरूदेव व आई सुरेखा पारेकर, डॉ. सुहास कादे, आरोग्य विस्तार अधिकारी मंगल खताळ-खरात, नौशाद शेख, श्रद्धा एनकफळे, राजकुमार पाटील, जयमाला शिंदे, ज्योती तोडकर, सुमन गुडे, माधवी वाघमारे, मुंनाताई रेड्डी, दिग्विजय लवळे, रवी आरडक, संतोष कोळी, दीपक शिंदे आदी कर्मचारी उपस्थित होते.
---
फोटो : २२ अनगर
अनगर आरोग्य केंद्रात नूतन वैद्यकीय अधिकारी डॉ. मोनाली पारेकर यांचे स्वागत करताना माजी आमदार राजन पाटील, डॉ. सुहास कादे, वडील बिरूदेव, आई सुरेखा पारेकर, मंगल खताळ-खरात.