सध्या कोरोनाचा प्रार्दुभाव कमी होत आहे, असे समजून नागरिकसुद्धा आता काळजी घेत नाहीत. गर्दी करणे, मास्क न लावणे, असे निदर्शनास आले आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी किंबहूना पूर्णपणे नष्ट करण्यासाठी फक्त आरोग्य विभागाने सक्रिय होऊन चालणार नाही तर प्रत्येकाने काळजी घ्यावी, असे आवाहन गटविकास अधिकारी रविकिरण घोडके यांनी केले.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले म्हणाले की, कोरोनाची भीती दूर करणे व आत्मविश्वास निर्माण करणे. कोविड १९ चाचणी/तपासणी वाढविणे. ग्रामीण यंत्रणा सक्रिय, सक्षम बनविणे. स्वच्छता व निर्जंतुकीकरण मोहीम राबविणे, असा पंचसूत्री कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
पंढरपूरच्या यंत्रणेवर तीन तालुक्यांचा ताण
मंगळवेढा, माळशिरस, सांगोला या तालुक्यातील नागरिक उपचार घेण्यासाठी पंढरपुरात येतात. यामुळे इतर तीन तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्यसेवेचा ताण पंढरपुरातील आरोग्य यंत्रणेवर पडतो.
फोटो
१२पंढरपूर-कोरोना
ओळी
वाखरी (ता. पंढरपूर) येथे ‘माझे गाव कोरोनामुक्त गाव’ अभियानांतर्गत प्रतिज्ञा घेताना गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, गटशिक्षण अधिकारी महारुद नाळे, अन्य कर्मचारी व ग्रामस्थ.