माळशिरस तालुक्यात बहुतांश हॉस्पिटलमध्ये वाढत्या रूग्णांसाठी बेड मिळणे मुश्कील होत आहे. तालुक्यात कोविड केअर सेंटरमध्ये १००, खासगी ३२७, ग्रामीण रूग्णालयात १५ बेड तर खासगी रुग्णालयात व्हेंटिलेटर ४४ बेड उपलब्ध आहेत. ही संख्या वाढत्या कोरोनाच्या प्रकरणांमुळे कमी पडत आहेत. यामुळे आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या प्रयत्नातून आत नव्याने ४०० बेड असलेले कोविड सेंटर लवकरच सुुरू होणार असल्याची माहिती अर्जुनसिंह मोहिते-पाटील यांनी दिली. ग्रामदक्षता समिती आणि पोलीस पाटील यांनी पहिल्यासारखे सक्रिय होणे गरजेचे आहे.
मेडिकल हब व्हेंटिलेटरवर
अकलूज आसपासच्या जिल्ह्यातील प्रमुख मेडिकल हब म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी दररोज शेकडो रुग्ण वेगवेगळ्या रोगांवर उपचार घेतात. मात्र सध्या कोरोनामुळे या रुग्णालयात आसपासच्या जिल्ह्यातील रुग्णांची गर्दी वाढल्यामुळे या रुग्णालयांवर मोठा ताण निर्माण झाला आहे. अकलूज, माळशिरस, नातेपुते, मांडवे, सदाशिवनगर, पिलीव, पिंपरीसह काही गावे आघाडीवर आहेत. तर मोटेवाडी, कळंबोली, भांब, जळभावी, धानोरेसह काही गावे अद्याप शून्यावर आहेत. त्यामुळे मेडिकल हब सध्या व्हेंटिलेटरवर आला आहे.