या घटनेची माहिती मिळताच घेरडीचे शाखा अभियंता अशोक आलदर यांनी सदर तुटलेली वायर कर्मचाऱ्यांच्या मदतीने जोडून वीजपुरवठा सुरळीत केल्याने कुलूप बंद मेन गेट खुले केले. उन्हाळ्यामुळे उष्णतामध्ये होणारी वाढ व विजेच्या दाबामुळे डिकसळ अंतर्गत कुलकर्णी व शिंदे वस्तीवरील ट्रान्सफार्मर (डी.पी.) बुधवारी पहाटे मेन लाईनच्या तारा तुटल्याने शेती पिकांचे नुकसान झाले तर भल्या पहाटे परिसरातील वीज ही गुल झाली.
याबाबत शेतकरी व ग्रामस्थांनी वायरमन संतोष मोहिते याच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून शिंदे - कुलकर्णी वस्तीवर डीपी चितार फुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे असे सांगितले मात्र वायरमन त्या डीपीकडे फिरकला नाही. ग्रामस्थांनी महावितरण उपकेंद्र कार्यालयास टाळे ठोकून संताप व्यक्त केला. या घटनेची माहिती मिळताच घेरडीचे शाखा अभियंता अशोक आलदर यांनी डिकसळ गावाला भेट दिली. वस्तीवरील ट्रान्सफार्मरची वायर तुटली होती ती इतर कर्मचाऱ्यांकडून जोडून विद्युत पुरवठा पूर्ववत केला.
यावेळी उपसरपंच रणजित गंगणे ग्रामपंचायत सदस्य मिलिंद कुलकर्णी , मधुकर करताडे आदी उपस्थित होते
---
ग्रामस्थांनी यापूर्वी वायरमन कामचुकारपणा करतो म्हणून तक्रार केल्याने आम्ही त्यास लेखी व तोंडी समज दिली होती. तरीही त्याच्या वागण्यात बदल झाला नाही आता त्याच्यावर पुढील योग्य ती कारवाई केली जाईल
- अशोक आलदर, शाखा अभियंता , घेरडी
----फोटो ...११डिकसळ