१४ ऑक्टोबर २०२० रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे दहिगाव उपसा सिंचन योजनेचा मुख्य कालवा कुंभेज येथे फुटला होता. त्यामुळे कालव्याच्या दुरुस्ती कामामुळे रब्बी आवर्तन सुरू करण्यास उशीर झाला. त्यामुळे रब्बी व उन्हाळी ही दोन्ही आवर्तने सलग देण्यात आली. त्यामुळे प्रत्येक गावाला एकाच वेळेस दोन्ही आवर्तनाचे पाणी मिळाले. नियमाप्रमाणे टेल टू हेड पाणी देणे अपेक्षित असताना तसे झाले नाही.
----
पाटबंधारे उपविभागातील एक अधिकारी कोरोना झाल्याने एप्रिल महिन्यापासून रजेवर गेले. त्यामुळे घोटीपर्यंत पाणी पोहोचणे दूरच राहिले. शिवाय कालवा फोडणाऱ्यांवर कारवाईचे आश्वासनही हवेतच विरले आहे. तर आमदार संजय शिंदे यांनाही अधिकारी खरी माहिती देत नसल्याने पाणी पोहोचले की नाही याची त्यांनाही कल्पना नाही.
- सविता राऊत,सरपंच घोटी.
----
घोटी उपकालव्याच्या चारीचे थोडे काम राहिले आहे. त्यामुळे त्या भागात पाणी न पोहोचल्याने मलवडी व घोटीला पाणी मिळाले नाही. त्या शिवाय तांत्रिक कारणेही होती. पुढच्या आवर्तनात घोटीला प्राधान्याने पाणीपुरवठा केला जाईल.
-सी.ए. पाटील,अभियंता कुकडी कालवा उपविभाग.
---