बार्शी तालुक्यात पूर्वी बार्शी शहर, पांगरी व वैराग ही तीन पोलीस ठाणी होती. यामध्ये कित्येक गावांना पांगरी व वैराग ही पोलीस ठाणी लांब पडत असल्यामुळे या दोन पोलीस ठाण्यांसह शहर हद्दीत असलेल्या आसपासच्या गावांचा समावेश करून नवीन तालुका पोलीस ठाणे करावे, ही २५ वर्षांपासूनची मागणी भाजप सरकारने पूर्ण केली. त्यानंतर शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या शहर पोलीस ठाण्याच्या सरकारी जागेत हे पोलीस ठाणे सुरू झाले.
सध्या पोलीस ठाणे सर्वांच्याच सोयीचे
सध्याचे पोलीस ठाणे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे, तसेच बसस्थानकापासून जवळ अंतरावर आहे. आरोपींना न्यायालयात हजर करण्यासाठी न्यायालयही जवळ आहे. आरोपी पोलीस कस्टडीमध्ये असल्यानंतर त्याला ठेवण्यासाठी शहर पोलीस ठाणेही जवळ आहे. त्यामुळे नागरिकांना हे पोलीस ठाणे सोयीचे आहे.
स्थलांतराला माजी मंत्री दिलीप सोपल यांचा विरोध
सध्याच्या पोलीस ठाण्याच्या स्थलांतराला माजी आमदार दिलीप सोपल यांनी विरोध केला आहे. जर स्थलांतरच करायचे असेल तर शहरातील नगरपालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटरमध्ये किंवा जुन्या बंद असलेल्या जवाहर हॉस्पिटलमध्ये स्थलांतरित करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
कोट :::::::::
आहे त्या ठिकाणची जागा अपुरी पडत आहे. तसेच पार्किंगसाठी ही जागा नाही. त्यामुळे आम्ही वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्यासाठी बायपासवर जागा निश्चित केली. त्या ठिकाणी कामही सुरू केले आहे. मात्र अद्याप स्थलांतर करण्याची तारीख निश्चित केलेली नाही़
- शिवाजी जायपत्रे,
सहायक पोलीस निरीक्षक, तालुका पोलीस ठाणे
तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गावे
शेलगाव (मा), जामगाव (आ), भोयरे, ताडसौंदणे, वानेवाडी, शेलगाव (व्हळे), गाडेगाव, कांदलगाव, खडकलगाव, मांडेगाव, बेलगाव, उंबरगे, बावी(आ), तावडी, आरणगाव, बाभूळगाव, आगळगाव, कुसळंब, धोत्रे, बोरगाव, चारे, चुंब, धामणगाव, धानोरे, कोरेगाव, पाथरी, खडकोणी, धनगरवाडी, भानसळे, देवगाव (मा), पिंपळगाव (धस), काटेगाव , खांडवी, अलिपूर, शेंद्री, गाताचीवाडी, उपळाई ठोंगे, वांगरवाडी, कासारवाडी, बळेवाडी, कव्हे, कोरफळे, दडसिंगे, सौंदरे, फपाळवाडी, लक्ष्याची वाडी, तावरवाडी, भोईंजे, श्रीपतपिंपरी, गोडसेवाडी, कोरफळे, मालवंडी, गुळपोळी, तुर्क पिंपरी, सुर्डी, उंडेगाव, रस्तापूर, पानगाव, नागोबाचीवाडी या गावांचा तालुका पोलीस ठाण्यात समावेश आहे.