शहर व तालुक्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. कोरोना वाढीला आळा घालण्यासाठी प्रशासनाने व्यापारी व नागरिकांना कोरोना नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तरीही त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळे पालिका व पोलीस प्रशासनाने कारवाईचा बडगा उचलण्यास सुरुवात केली आहे.
गुरुवारी शहरातील सोमवार पेठेतील एका इलेक्ट्रॉनिक्स दुकान मालकाने स्वतः मास्क वापरले नाही. विनामास्क असलेल्या ग्राहकांना दुकानांमध्ये प्रवेश दिला. तसेच दुकानांमध्ये ग्राहकांना सॅनिटायझरदेखील उपलब्ध करून दिले नाही म्हणून संबंधित दुकानाच्या मालकावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच हे दुकान महिनाभरासाठी सील केले आहे. यापूर्वीदेखील लॉकडाऊनदरम्यान याच दुकानदाराने जिल्हाधिकारी यांनी निर्गमित केलेल्या आदेशांचे उल्लंघन केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
संबंधित दुकानदाराने दुसऱ्या वेळेस हा गुन्हा केलेला असल्याने हे दुकान पोलिसांनी ३० दिवसांसाठी सील केले आहे. शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी ही कारवाई केली आहे.
फोटो
२६बार्शी-क्राईम
ओळी
कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याने बार्शीतील इलेक्ट्रॉनिक्स दुकान सील करताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी व नगरपालिकेचे अधिकारी.