बार्शीतील शिवाजीनगर येथील एक वडापाव सेंटर संचारबंदीतही चालू असल्याचे नगरपालिकेच्या पथकास दिसले. त्याने कायद्याचे उल्लंघन केल्याचे पथकाने त्याच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी जाताच वडापाव सेंटर चालकाने तातडीने ५ हजार रुपये दंडाची पावती फाडून पुढील होणारी कारवाई टाळली आहे. ही धडक कारवाई आरोग्य विभागाचे स्वच्छता निरीक्षक शब्बीर वस्ताद, सुपरवायझर भोलेनाथ खलसे, जयपाल वाघमारे, अभय राज ओहोळ, विनोद लंकेश्वर या दंड पथकाने केली.
प्रशासनाने दिलेल्या नियमाचे पालन न करणाऱ्या नागरिक व व्यवसायधारकावर यापुढे अशीच कारवाई करण्यात येईल. त्यामुळे नागरिकांनी कडक निर्बंध असताना अत्यावश्यक सेवेशिवाय कोणत्याही कारणास्तव घराबाहेर पडू नये. प्रशासनाच्या नियमाचे पालन करून सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.