ठळक मुद्देभारत बंद चा सोलापूरच्या बाजारपेठांवर किरकोळ परिणामसकाळच्या सत्रातील बहुतांश शाळांना सुट्टीछत्रपती शिवाजी महाराज चौकातून वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा निघणार
सोलापूर : राष्ट्रीय नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकता नोंदणी कायद्याविरुध्द वंचित बहुजन आघाडीने शुक्रवारी महाराष्ट्र बंद पुकारला आहे. सोलापुरात सिटी बसवर दगडफेक करुन काही लोक पसार झाले. पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला.
वंचित बहुजन आघाडीच्या बंदला काँग्रेस, एमआयएम, माकपसह जिल्ह्यातील १५० संघटनांनी पाठिंबा दिला. बार्शीतील शिवसेनेचे कार्यकर्ते या बंदमध्ये सहभागी झाले आहेत. सीएए आणि एनआरसी विरोधात सकाळी ११ वाजता शिवाजी चौकातून मोर्चा काढण्यात येत आहे.
या माेर्चासाठी अनेक कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमत होते. सकाळच्या सुमाराला बंदला बहुतांश भागात प्रतिसाद मिळाला आहे. शहरातील काही शाळा सुरू आहेत. काही शाळा बंद आहेत.