अकलूज : सन्मती सेवादल बहुउद्देशीय अल्पसंख्याक संस्था अध्यक्षपदी रत्नत्रय पतसंस्थेचे चेअरमन वीरकुमार दोशी यांची निवड करण्यात आली.
मांडवे येथे रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूल विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात पार पडलेल्या सोहळ्यात दोशी यांची निवड करण्यात आली, तसेच यंदा प्रथमच महिलांना संधी देण्यात आली. कामिनी गांधी, सुवर्णा शहा आणि सपना दोशी यांची संचालकपदी निवड करण्यात आली. या निवडीनंतर वेळापूर येथील भगवान कुंथुनाथ जैन मंदिर ट्रस्टच्या वतीने नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी आमदार श्री रणजितसिंह मोहिते पाटील, माळशिरस तालुक्याचे आमदार राम सातपुते, माळशिरसचे पंचायत समितीचे सभापती शोभा साठे, उपसभापती अर्जुनसिंह मोहिते-पाटील, माजी सभापती वैष्णवीदेवी मोहिते-पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, जिल्हा परिषद सदस्य अरुण तोडकर, अनंतलाल दोशी, मृणालिनी दोशी, स्त्रीरोगतज्ज्ञ सतीश दोशी, डाॅ. विकास शहा, संस्थापक अध्यक्ष मिहीर गांधी, उपाध्यक्ष महावीर दोशी, सचिव हितेश दोशी, प्रशांत गांधी, केतन दोशी, विक्रांत गांधी, रोहन गिल्डा, अमोल दोशी, संचालिका कामिनी गांधी, सुवर्णा शहा, सपना दोशी उपस्थित होते.
----
२० कामिनी गांधी
सन्मती सेवादल बहुउद्देशीय संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीनंतर त्यांचा सत्कार सोहळा पार पडला.