दक्षिण सोलापूर : आमदार सुभाष देशमुख यांनी मतदारसंघातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी देऊन तेथील लसीकरणाची माहिती घेतली. नागरिकांशी संवाद साधत कोरोना मुक्तीसाठी नि:संकोचपणे लस घेण्याचे आवाहन केले.
आमदार सुभाष देशमुख यांनी सकाळी सोरेगाव येथील लसीकरण केंद्राला भेट दिली. येथील आरोग्य अधिका-यांशी चर्चा केली. उपलब्ध लसींची माहिती घेतली त्यानंतर तालुक्यातील कंदलगाव मंद्रूप प्राथमिक आरोग्य केंद्रांना तसेच माळकवठे उपकेंद्राला भेट दिली. केंद्रात सुरू असलेल्या लसीकरणाची माहिती घेतली. केंद्राबाहेर उभ्या असलेल्या नागरिकांशी संवाद साधला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनामुक्त भारतासाठी सुरू केलेल्या अभियानाची माहिती तरुणांना दिली. स्वतः लस घ्या, कुटुंबातील व्यक्तींनाही लस घेण्यास प्रवृत्त करा, असे आवाहन आमदार देशमुख यांनी केले.
यावेळी त्यांच्यासमवेत भाजपाचे सरचिटणीस हणमंत कुलकर्णी, मनपाच्या नगरसेविका संगीता जाधव, अश्विनी चव्हाण, जिल्हा परिषदेचे पक्षनेते अण्णाराव बाराचारे, मंद्रूपचे माजी सरपंच विश्वनाथ हिरेमठ, दक्षिण सोलापूर भाजपचे तालुका अध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी, उत्तर सोलापूरचे तालुकाध्यक्ष काशीनाथ कदम, मळसिद्ध मुगळे, प्रशांत कडते, महेश देवकर भीमराव कुंभार एम. डी. कमळे, यतीन शहा, श्रीनिवास करली, सुनील गुंड, शशी थोरात, आनंद बिराजदार, श्रीमंत बंडगर, श्रीकांत ताकमोगे, इरप्पा बिराजदार, अतुल गायकवाड, भारत जाधव, अमोल गायकवाड, प्रथमेश कोरे, अक्षय अंजीखाने उपस्थित होते.
--------
फोटो : १४ सुभाष देशमुख
प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसीकरणाची माहिती घेताना आमदार सुभाष देशमुख आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी.