पंढरपूर : थंडीपासून संरक्षण व्हावे यासाठी सामान्य माणसाप्रमाणे श्री विठ्ठलाला देखील ऊबदार कपड्याचा पोषाख परिधान करण्यात आला आहे.
सध्या राज्यात कडाक्याची थंडी सुरू आहे. यामुळे अनेकजण थंडीपासून संरक्षण व्हावे यासाठी ऊबदार कपड्याचा वापर करत आहेत. त्याचप्रमाणे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेस थंडी वाजू नये यासाठी मंदिर समितीकडून रजाई, शाल, मफलर व कान पट्टा असा पोशाख परिधान केला असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.