पंढरपूर : परिवर्तन एकादशी निमित्त अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठल रुक्माई मूर्तीच्या गाभाºयाला तुळशीची सजावट करण्यात आली आहे.
सध्या गणेश उत्सव चालू असल्यामुळे मंदिरामध्ये दहा दिवस विविध कार्यक्रम सुरू आहेत. त्याचबरोबर विठ्ठल विठ्ठल रुक्मिणी मातेला रोज विविध अलंकार परिधान केला जातो. गुरुवारी परिवर्तन एकादशी असल्यामुळे विठ्ठल रुक्मिणी मातेला तुळशी ची सजावट केली होती. मंदिरातील सोळखांबी, विठ्ठल गाभारा, रुक्मिणी गाभारा व अन्य ठिकाणी तुळशीचे हार बांधण्यात आले.
परिवर्तन एकादशी असल्यामुळे सकाळपासूनच स्टेशन रोड, प्रदक्षिणा मार्ग, चंद्रभागा वाळवंट व मंदिर परिसर आदी परिसरात भाविकांची गर्दी होती. विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेणाºया भाविकांना मंदिरातील तुळशीचे सजावट पाहून अधिक प्रसंनन वाटत होते.