शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

विठ्ठल-रुक्मिणी मंदिर संवर्धन कामास सुरुवात

By काशिनाथ वाघमारे | Published: December 16, 2023 5:54 PM

मंदिराच्या मूळ ढाच्यास धक्का न लावता कामे केली जाणार आहेत.

सोलापूर : पंढरपुरातील विठ्ठल - रुक्मिणी मंदिर व परिवार देवतांची मंदिरे खूप प्राचीन स्वरूपाची आहेत. मंदिरांचे सुशोभीकरण केल्यास त्यांची प्राचीन शैली जपण्यास मदत होणार आहे. यामुळे विठ्ठल-रुक्मिणी मंदिर व परिवार देवता मंदिर संवर्धन विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यातील कामास शनिवारी बाजीराव पडसाळी येथे विधिवत पूजा करून प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली. मंदिराच्या मूळ ढाच्यास धक्का न लावता कामे केली जाणार आहेत.

मंदिराच्या सर्वांगीण विकासकामाची सर्वंकष अंदाजित रक्कम ७३ कोटी ८५ लाख रुपयांचा आराखडा (डीपीआर) पुरातत्व विभागाच्या नामिका सुचीतील वास्तुविशारदांकडून तयार करण्यात आला. या आराखड्याला मंदिर समिती, जिल्हास्तरीय समिती व मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीने तसेच मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील २३ मे २०२३ रोजी पार पडलेल्या शिखर समितीच्या बैठकीत ७३ कोटी ८५ लाख ९५ हजार रुपयांच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिर व परिवार देवता मंदिर संवर्धन विकास आराखड्यास मान्यता दिली होती. या आराखड्यातील पहिल्या टप्प्यातील कामांसाठी पुरातत्व विभागामार्फत ई-निविदा राबविली होती. त्यामध्ये मे. सवानी हेरीटेज कॉन्झर्वेशन प्रा.लि., मुंबई यांची ई-निविदा २७ कोटी ४४ लाख ११ हजार ७६५ रुपये मंजूर केली आहे. ही सर्व कामे मंदिराच्या मूळ ढाच्यास धक्का न लावता होणार असल्याचे ह.भ.प. औसेकर यांनी सांगितले. यावेळी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्य शकुंतला नडगिरे, संभाजी शिंदे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख (जळगावकर), ह.भ.प. प्रकाश जवंजाळ तसेच कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, बांधकाम विभागप्रमुख बलभीम पावले व ठेकेदार येवले उपस्थित होते.

ही कामे होणार सुरू...याकामामध्ये मुख्य मंदिर व संकुलातील मंदिराचे जतन संवर्धन, मुख्य विठ्ठल मंदिर (गर्भगृह, चारखांबो, सोळखांबो, अर्धमंडप इ.), रुक्मिणी मंदिर, नामदेव पायरी व त्यावरील इमारतीचे नूतनीकरण, महाद्वार व दोन्ही बाजूच्या पडसाळी ५, महालक्ष्मी मंदिर, व्यंकटेश मंदिर, मंदिरातील इतर इमारती (बाजीराव पडसाळ, पश्चिम दरवाजा तसेच मंदिरातील ३८ परिवार देवता काशी विश्वेश्वर, शनैश्वर, खंडोबा, गणपती, राम मंदिर वगैरे) मंदिरातील दीपमाला कामे प्रस्तावित आहेत.

टॅग्स :Pandharpurपंढरपूर