कुर्डूवाडी : विठ्ठलगंगा फार्मर्स प्रोड्युसर कंपनी येथे अत्याधुनिक माती, पाणी, पान व देठ परीक्षण प्रयोगशाळेचे भूमिपूजन पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार अरुण लाड यांच्या हस्ते झाले.
यावेळी आमदार बबनराव शिंदे, आमदार संजयमामा शिंदे, डाळिंब संशोधन केंद्राचे संचालक डाॅ. राजीव मराठे, विभागीय कृषी संचालक बसवराज बिराजदार, गटविकास अधिकारी संताजी पाटील, क्षेत्र विक्री व्यवस्थापक संजय अलकट्टी, तालुका कृषी अधिकारी भारत कदम, व्हाइस चेअरमन वामनभाऊ उबाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी अतिथी आमदार अरुण लाड यांनी माढा वेलफेअर फाउंडेशन, मुकुल माधव फाउंडेशन, फिनोलेक्स इंडस्ट्रीज यांच्या सहयोगातून विठ्ठलगंगा फार्मर्स प्रोड्युसर कंपनीने सुरू केलेल्या माती, पाणी, पान व देठ परीक्षण प्रयोगशाळेचा येथील शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल, असे गौरवोद्गार काढले.
यावेळी विठ्ठलगंगाचे चेअरमन धनराज शिंदे यांनी माढा वेलफेअर फाउंडेशन, विठ्ठलगंगाच्या कार्याचा आढावा मांडला. फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे प्रदीप शास्त्री वेदुला आणि मुकुल माधव फाउंडेशनचे संचालक बबलू मोकळे यांनी मनोगते व्यक्त केली.
यावेळी बंडूनाना ढवळे, भारत शिंदे, शंभुराजे मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीपराव भोसले, माजी उपसभापती प्रताप नलवडे, उपसभापती सुहास जामगावकर, नागनाथ पाटील, प्रभाकर पाटील, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष रमेश पाटील, धानोरेचे सरपंच अनिल देशमुख, व्यवस्थापकीय संचालक एस. एन. डिग्रजे, सुहास यादव, डॉ. प्रदीप पाटील, सचिव युवराज शिंदे, संचालक यशवंत शिंदे, महेश डोके, राहुल वरपे, आनंद पानबुडे, महेश मारकड, केशव आवटे, अक्षय गुडेकर, विक्रम डक, संदीप मोरे, लहू पेटकर, नीलेश शिंदे, अभिनंदन खटके, राजेंद्र कोयले, समाधान लोंढे उपस्थित होते.
---
फोटो : ०९ कुर्डुवाडी
विठ्ठलगंगाच्या पाणी, पान व देठ परीक्षण प्रयोगशाळेचे भूमिपूजन करताना पदवीधर मतदारसंघाचे आमदार अरुण लाड, आ. बबनराव शिंदे, आ. संजय शिंदे, डाॅ. राजीव मराठे, कृषी संचालक बसवराज बिराजदार.
090921\img-20210909-wa0302.jpg
आ अरुण लाड बातमी फोटो