विठ्ठलाच्या परिवार देवतांमधील रिद्धी-सिद्धी मंदिर, लक्ष्मण पाटील देवस्थान, अंबाबाई मंदिर, रोकडोबा मारुती मंदिर, सोमेश्वर महादेव मंदिराच्या नूतनीकारण व सभा मंडपाच्या सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन झाले. त्याचबरोबर मंदिरामध्ये नव्याने बांधलेल्या कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापक यांच्या कार्यालयाचेही उद्घाटन करण्यात आले.
यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहायक अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवार, सदस्य संभाजी शिंदे, हभप ज्ञानेश्वर महाराज जळगावकर देशमुख, शकुंतला नडगिरे, साधना भोसले यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
हे विठ्ठल भक्त करणार खर्च
श्री विठ्ठल-रुक्णिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांच्याकडे भाविकांनी मंदिरातील कामे करण्याची इच्छा दर्शवली आहे. यामध्ये राम बच्चन यादव (मुंबई) यांनी ८ लाख, दीपक नारायण करगळ (पुणे) यांनी २५ लाख, श्रीकांत कोताळकर (पंढरपूर) यांनी २३ लाख, अशिम अशोक पाटील (कोल्हापूर) यांनी २५ लाख, नानासाहेब दिनकरराव पाचुंदकर - पाटील (पुणे) यांनी ३० लाख या विठ्ठल भक्तांचा समावेश आहे.
---२५पंढरपूर-मंदिर--
फोटो : श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या परिवार देवताच्या मंदिर कामाचे भूमिपूजन करताना मंदिर समितीचे सहायक अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवार, सदस्य संभाजी शिंदे, हभप ज्ञानेश्वर महाराज जळगावकर देशमुख, शकुंतला नडगिरे, साधना भोसले.
----