पंढरपूर : तालुक्यातील बाभूळगाव येथे प्रभातफेरी काढून मतदार जनजागृती दिन साजरा करण्यात आला. यावेळी कोरोना निर्मूलनाची शिक्षक, लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांनी शपथ घेतली. तसेच मतदानाचा हक्क सर्वांनी बजावून लोकशाही बळकट करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला.
केंद्रप्रमुख भोसले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दरम्यान, सर्व शिक्षकांनी कोरोना चाचणी करून शाळेत हजर राहावे, अशा सूचना केल्या. यावेळी गावातील सर्व शाळा व परिसर स्वच्छ करण्यात आला. गावातील मतदानाचा टक्का वाढविण्याबरोबर संपूर्ण गाव साक्षर करण्याचा निर्णयही घेण्यात आला.
यावेळी नूतन ग्रामपंचायत सदस्य गणेश चव्हाण, अशोक सरवदे, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य दगडू चव्हाण, तानाजी चव्हाण, बालराज चव्हाण, ग्रामसेवक इंगोले, लिपिक मुन्ना चव्हाण, पोलीस पाटील आनंद कोळी, नितीन कोरके, नवनाथ विठ्ठल माळी, रेणुका विद्यालयाच्या मुख्याध्यापिका राखी गाभूड, अजिनाथ सरवदे, अरविंद सरवदे, गणेश लटके, मेटकरी, महेश कथले आदी उपस्थित होते.
फोटो ओळी :::::::::::::::::::::
राजश्री पवार, जगन्नाथ दुधाळ, संजय पाटील, महादेव काळेल, संतोष माने, दत्तू बिरादार, सोनाबाई शेळके, रत्नमाला उटगे, स्वाती भोसले, सुलभा कदम.