सोलापूर : उजनीच्या पाण्यासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावांनी विधानसभा मतदार निवडणुकीसाठी होणाºया मतदानावर बहिष्कार टाकला होता़ मात्र सोमवारी सुरू झालेल्या मतदान प्रक्रियेत या गावातील नागरिकांनी सहभाग मतदान करण्यास सुरूवात केली आहे. हा बहिष्कार आता मागे घेतल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील दर्गनहळ्ळी, कर्देल्ली, धोत्री , शिरपनहळ्ळी, वडगाव, बोरामणी, वडगांव, लिंबीचिंचोळी, कुंभारी, उळे, कासेगांव, मुस्ती ही गावे दक्षिण सोलापूर तालुक्यातील असली तरी त्यांचा समावेश अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात येतो.
या गावांनी उजनीच्या पाण्यासाठी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. हा बहिष्कार आता मागे घेतल्याचे दिसून येत आहे़ याबाबत जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ़ राजेंद्र भोसले यांना निवेदनही दिले होते़ सकाळपासूनच मतदार उत्स्फूर्तपणे मतदानासाठी बाहेर पडत असल्याचे चित्र दिसत आहे.