शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
4
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
5
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
6
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
7
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
8
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
9
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
10
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
11
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
12
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
13
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
14
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
15
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
16
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
17
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
18
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
19
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
20
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

वाघाटी मांजर म्यॉऽऽव म्यॉव करत आली... छोटे वाघोबाच असल्याचा भास करून गेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2020 3:34 PM

सोलापुरात आढळली दुर्मिळ प्रजाती : मंगळवेढ्याजवळील उसाच्या फडात झाले दर्शन

ठळक मुद्देबेसुमार जंगलतोडीमुळे वन्य पशुप्राणी हल्ली लोकवस्तीजवळील माळरानं, शेतांमध्ये दिसू लागली आहेतबिबट्याच्या वावरामुळे भीतीच्या सावटाखाली येऊन दोन महिने उलटून गेले मंगळवेढ्याजवळील एका शेतात छोट्या चणीच्या दुर्मीळ वाघाटी मांजराचे दर्शन झाले

सोलापूर : बेसुमार जंगलतोडीमुळे वन्य पशुप्राणी हल्ली लोकवस्तीजवळील माळरानं, शेतांमध्ये दिसू लागली आहेत. बिबट्याच्या वावरामुळे भीतीच्या सावटाखाली येऊन दोन महिने उलटून गेले असतानाच मंगळवेढ्याजवळील एका शेतात छोट्या चणीच्या दुर्मीळ वाघाटी मांजराचे दर्शन झाले. अर्थातच पिलांसह म्यॉव, म्यॉव करणारं हे जंगली मांजर भीतीदायक नव्हतं; पण वाघासारखं दिसणारं वेगळं अन् आकारानं मोठं होतं..वनविभागानं वाघाटी मांजराच्या पिलांवर लक्ष ठेवून त्यांची आई आल्यानंतर सुटकेचा नि:श्वास सोडला.

मंगळवेढ्यापासून सहा किमी अंतरावर असलेल्या बापू भुसे यांच्या उसाच्या फडात तोडणी करताना श्रीकृष्ण डुकरे या शेतमजुरास पहिल्यांदा सुईऽऽ म्यॉवऽऽ सुईऽऽ म्यॉव ऽऽ आवाज करणारी ही पिल्लं दिसायला मात्र वाघाच्या बछड्यासारखी वाटत असल्याने त्यांनी वनपरिक्षेत्र अधिका?्यांना कळविले. उपवन संरक्षक धैर्यशील पाटील यांनी स्वत: जागेवर जाऊन पाहणी करून दुर्मीळ वाघाटी मांजर असल्याची खात्री केली. डॉक्टर सुहास सलगर त्या पिलांची वैद्यकीय तपासणी करून त्या पिलांना देण्यात येणा?्या अन्नाची माहिती दिली.

पिले लहान असल्याने आईची भेट घडवून आणणे अत्यंत गरजेचे होते. परिसरात इतर प्राण्यांचा वावर होऊ नये याची दक्षता घेत टेहळणीसाठी कॅमेरे लावून वनखात्याने चोहोबाजूने जागता पहारा ठेवला. या मोहिमेत वनपरिक्षेत्र अधिकारी विजय बाठे, विलास पवळे, वनरक्षक गोरख माळी, भगवान मासाळ, सुनीता पत्की, किसन कांबळे, रमेश माने, सोपान कळसाई, द?्याप्पा न्यामगुंडी, तमण्णा रूपनर, सागर राऊत या वनविभागाच्या अधिकारी आणि सेवकांचा सहभाग होता. सोमवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास दुर्मीळ वाघाटी मांजराने एकेक करीत दोन्ही पिलांना अलगदपणे आपल्या तोंडात धरून सुरक्षित ठिकाणी नेताना वनखात्याच्या कॅमेºयात कैद झाले. हे दुर्मीळ मांजर दिसण्याची पहिलीच घटना असल्याची शक्यता आहे.-----------भारत, श्रीलंका, नेपाळमध्ये आढळणारे मांजर...वाघाटीमांजर हे मुख्यत: भारत, श्रीलंका आणि नेपाळच्या पश्चिम भागात आढळतात. शिकार आणि अधिवासास अनुकूल वातावरण न मिळाल्याने यांची दुर्मीळ होत चाललेल्या प्रजातीत गणना केली जाते. लहान पक्षी, सरपटणारे प्राणी, काहीवेळा पाळीव बदक आणि कोंबड्या हे त्यांचे खाद्य आहे .-----------मांजरे रात्रीच कार्यप्रवण असतात. ती रात्री पिलांच्या शोधात येईल, याची खात्री होती. पहाटे साडेतीनच्या सुमारास मांजरीने अलगदपणे पिलांना घेऊन जातानाचे चित्र कॅमेरात कैद झाले. सध्या ऊसतोडीचे दिवस आहेत. मुंगूस, कोल्हे, ससे, लांडगे आदींची पिलं आढळतात.

- धैर्यशील पाटील, उपवनसंरक्षक, सोलापूर.

टॅग्स :Solapurसोलापूर