---
भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाचा रस्ता
कुरनूर-बावकरवाडी-चपळगाव हा अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे. मराठवाडा आणि अक्कलकोट तालुक्याला जोडणारा हा रस्ता आहे. तसेच याच रस्त्यावर कुरनूरचे धरण असून, तालुक्याच्या उत्तर भागातील बागायतीचे मोठे क्षेत्रदेखील येथेच आहे. मात्र या रस्त्याची दुरवस्था झाल्याने वाहतुकीची कसरत होत आहे, दुरुस्ती व्हावी ही अपेक्षा आहे.
-पप्पू भोसले, शेतकरी,चपळगाव
---
अनेक वर्षांपासून मरणयातना
हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. वास्तविक कुरनूर गावच्या जनतेला तालूका, जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी हा रस्ता सोयीस्कर आहे. यामुळे संबंधित विभागाकडून या रस्त्याची दुरुस्ती व्हावी ही अपेक्षा आहे.
- व्यंकट मोरे, सरपंच, कुरनूर
---
फोटो : ०७ कुरनूर
कुरनूर धरणाकडे जाणाऱ्या रस्त्याची झालेली दुरवस्था.
070721\img_20210707_091226.jpg
कुरनूर धरणाची वाट बिकट झाल्याने वाहतुकीची कसरत होत आहे.ठिकठिकाणी पडलेले खड्डे