शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
2
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
3
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
4
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
5
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
6
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
7
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
8
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
9
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
10
Pune Crime: महिलेची हत्या, पोत्यात बांधून झुडपात फेकला मृतदेह; घटना कशी आली उघडकीस?
11
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
12
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
13
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार
14
सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी
15
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
16
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
17
हलगर्जीपणाचा कळस! प्रसूतीनंतर डॉक्टरांकडून पोटात राहिला 'टॉवेल'; महिलेला प्रचंड वेदना अन्....
18
Perfect Tea Recipe: टपरीवरचा फक्कड चहा बनवा घरच्या घरी; फक्त 'आलं' टाकताना करा 'हा' छोटासा बदल!
19
Vodafone Idea च्या शेअर्समध्ये १७% ची तेजी, सरकारच्या एका निर्णयामुळे गुंतवणूकदारांच्या उड्या
20
HDFC Life Insurance Data Leak : 'या' दिग्गज लाइफ इन्शुरन्स कंपनीचा डेटा लीक; तुम्ही तर नाही आहात ना पॉलिसी होल्डर?

एक घागर पाण्यासाठी तीन तासांची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 3:03 PM

मोहोळ तालुक्यातील नरखेड गावातील दुष्काळी कहाणी; पाण्याअभावी विहिर, बोअर पडले कोरडे

ठळक मुद्देवैराग रोडवर मोहोळपासून १३ कि.मी. अंतरावर वसलेले साडेपाच हजार लोकसंख्येचे नरखेड हे गावभोगावती नदी गेल्या सहा महिन्यांपासून व सीना नदी महिन्यापासून कोरडी जमिनीतील पाणीपातळी खोल गेल्यामुळे ४०० फुटांपर्यंत बोअर घेतले तरी ते कोरडे जात असल्याने गावकरी आणि शेतकरी हतबल

हणमंत पवार 

नरखेड : वैराग रोडवर मोहोळपासून १३ कि.मी. अंतरावर वसलेले साडेपाच हजार लोकसंख्येचे नरखेड हे गाव. गावात मोठ्या वाड्या-वस्त्या. गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी भोगावती नदीमध्ये दोन विहिरी, ग्रामपंचायत कार्यालयालगत विहीर, सीना नदीवरून दोन गावांतर्गत पाईपलाईन, गावामध्ये पाण्याचे ४ आड, ४ हातपंप, १०-१२ बोअर एवढी साधने असूनही फक्त ग्रामपंचायत कार्यालयातील बोअर आणि सीना नदीवरील संगमावरून केलेली पाईपलाईन हा पर्याय वगळला तर गावातील विहिरी, बोअर आटले आहेत.

ग्रामपंचायतीचे सर्वच बोअर बंद पडले आहेत. सिद्धेश्वर मंदिरासमोरील बोअरला तुटक-तुटक पाणी येत असल्याने हा आधारही कधी बंद पडेल, याचा भरवसा राहिलेला नाही.

ज्वारी हे मुख्य पीक गावकरी घेतात, मात्र पाण्याअभावी उत्पादन घटले आहे. ज्वारीव्यतिरिक्त इतर पिके पाण्याअभावी जळून चालली आहेत. भोगावती नदी गेल्या सहा महिन्यांपासून व सीना नदी महिन्यापासून कोरडी आहे. जमिनीतील पाणीपातळी खोल गेल्यामुळे ४०० फुटांपर्यंत बोअर घेतले तरी ते कोरडे जात असल्याने गावकरी आणि शेतकरी हतबल झाले आहेत. 

गावाशेजारील अनेक वाड्यावस्त्यांवर बोअर, विहिरी आहेत. त्याही २० ते २५ मिनिटांपुढे चालत नाहीत. शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय आहे. गावात ४-५ दूध डेअºया आहेत, परंतु पाणीटंचाईमुळे हा व्यवसाय धोक्यात आला आहे. दुपारच्या तीव्र उन्हामध्येसुद्धा पिण्याच्या व जनावरांच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. जनावरांच्या खाद्याचे भाव वाढल्याने दुधाचा व्यवसायही तोट्यात आल्याने गावकºयामंध्ये नैराश्य दिसत आहे. नरखेड भागासह गावात चारा छावणीची मागणी करूनसुद्धा मंजूर झाली नाही.

या संकटाच्या दिवसात गावातील बागायतदार बांधव स्वत:च्या पीकशेतीला पाणी न देता तेच पाणी गावाला देत आहेत. सोसायटी चेअरमन जयवंत पाटील, काकासाहेब पाटील, गौरीहर भडंगे, पांडुरंग शेंडगे, वसंत भडंगे, हरिदास मोटे, सुनील भडंगे यांनी या कामी पुढाकार घेतला आहे. काही बोअरमालकांनीही सहकार्याचा हात गावासाठी पुढे केला आहे. नरखेडसह मसले चौधरी, देगाव येथे सर्वात जास्त पाणीटंचाई असून त्या खालोखाल डिकसळ, भोयरे, एकुरके, बोपले, मलिकपेठ, हिंगणी, भांबेवाडी, यलमवाडी आदी भागातील वाड्यावस्त्यांवर पाणीटंचाई भासत आहे.

पाणी मिळविण्यासाठी अख्या गावात जणू स्पर्धाच..- या गावाला भेट दिली तेव्हा ग्रामपंचायतीसमोरील बोअरवर प्रचंड गर्दी दिसली. दोन घागरीसाठी व्यवसाय-कामधंदा सोडून नंबर लावून दिवसभर रांगेत असलेले गावकरी दिसले. ते म्हणाले, फक्त दोन घागरीसाठी दिवसभर रांगेत ३ तास उभे राहावे लागत आहे. संगमावरील सीना नदीवर पाण्यासाठी खड्डा खोदून नवीन पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. दोन टँकरद्वारे गावात पाणी येते. ते विहिरीमध्ये सोडले जाते. तेथून पाईपलाईनने गावाला येते. ते मिळविण्यासाठी अख्या गावात जणू स्पर्धा असते. 

गावातील सर्व विहिरी कोरड्या पडल्याने आम्ही सीना नदीवरील संगमातून नवीन पाईपलाईन केली आहे, तर दोन टँकर व काही बोअरच्या माध्यमातून गावातील पाणीटंचाई दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे.- उमेश पाटील, जि. प. सदस्य 

सीना नदीवरील घाटणे बॅरेज ५ ते ७ मीटरने अडविल्यास व गावातील पाण्याचे नियोजन केल्यास नरखेडसह भागातील पाणीटंचाई दूर होण्यासाठी मदत होईल. त्यासाठी सीना-भोगावती जोडकालवा होणे गरजेचे आहे. - शहाजी मोटे, माजी सरपंच

ग्रामपंचायतीला पाणीपुरवठ्यासाठी शासनाच्या वतीने मोठा निधी उपलब्ध झाला आहे. परंतु दुष्काळ, पाणीटंचाई व नियोजनाअभावी पाण्यासाठी लोकांचे हाल होत आहेत.- सुधाकर काशिद गुरुजी, अंनिस कार्यकर्ते 

नरखेडमधील पाणीटंचाई दूर करण्यासाठी शासनाकडून दोन टँकरला मंजुरी मिळाली आहे. नवीन पाईपलाईन व काही बोअरच्या आणि गावाशेजारील शेतकºयांच्या खासगी बोअरच्या माध्यमातून पाणीटंचाई दूर करण्याचा प्रयत्न चालू आहे.-तात्यासाहेब नाईकनवरे, ग्रामसेवक

टॅग्स :Solapurसोलापूरdroughtदुष्काळWaterपाणीwater transportजलवाहतूक