मसले चौधरीतील निवडणुकीत लोकनेते ग्रामविकास पॅनेल व ग्रामविकास आघाडी अशा दोन पॅनेलमध्ये ही निवडणूक लागली होती. यामध्ये लोकनेते ग्रामविकास पॅनेलचे प्रमुख हनुमंत पोटरे यांच्या गटाला सहा जागा, तर ग्रामविकास आघाडीचे प्रमुख सतीश पाटील यांच्या गटाला तीन जागा मिळाल्या. मसले चौधरी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची सत्ता ठेवण्यात हनुमंत पोटरे यांना यश आले.
भोयरे ग्रामपंचायतीत जगदंबा स्वाभिमानी आघाडीचे प्रमुख तुकाराम खोचरे व राजकुमार पाटील यांच्या आघाडीने नऊ पैकी नऊ जागा मिळवीत यश संपादन केले, तर विरोधी गटाला पराभावाला सामोरे जावे लागले.
देगाव येथे लोकनेते बाबुरावअण्णा पाटील आघाडी व नागनाथ ग्रामविकास आघाडी अशा दोन गटांमध्ये निवडणूक झाली. यात सर्वपक्षीय नागनाथ ग्रामविकास आघाडीला नऊ जागा मिळाल्या, तर लोकनेते बाबूराव पाटील गटाला केवळ दोन जागांवर समाधान मानावे.
शिरपूर सो या ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामविकास आघाडी व लोकनेते ग्रामविकास आघाडी अशी लढत झाली. यात शिवसेना व भाजप आघाडीचे प्रमुख ब्रह्मदेव गोफणे, प्रकाश काळे, नाना चव्हाण यांच्या आघाडीला सर्वच्या सर्व अकरा जागा मिळाल्या. शिरापूर ग्रामपंचायत वरती भाजपा सेनेने बाजी मारली.
-----
चिठ्ठीनं दिली परिवर्तन आघाडीला साथ
वरकुटे ग्रामपंचायतीमध्ये परिवर्तन ग्रामविकास आघाडी व ग्रामविकास आघाडी अशा दोन गटांत निवडणूक झाली. निकालामध्ये दोन्ही गटाला तीन-तीन अशा समसमान जागा मिळाल्या, तर वार्ड क्रमांक ३ मध्ये तेजश्री बचुटे व मीनाक्षी बचुटे या दोन्ही महिलांना समान १०१ मते पडली होती. अखेर या दोन्ही उमेदवारांमध्ये चिठ्ठी टाकली असता तेजश्री बचुटे यांची चिठ्ठी निघाल्याने तेथे परिवर्तन आघाडीला जागा मिळाल्याने त्यांची सत्ता स्थापन झाली.
-----