शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

वांगीकरांच्या श्रमदानानं बंद हातपंप सुरू झाले अन् विहिरींची वाढली पाणीपातळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 8:29 PM

पाणी फाउंडेशनच्या निमित्ताने केलेल्या कामामुळे गावाचा तालुक्यात प्रथम क्रमांक आला व पाणीही अडले.

ठळक मुद्देउत्तर सोलापूर तालुक्यात आजतरी पाण्याचा दुष्काळ हटलेला नाहीमागील वर्षीही अशीच भीषण परिस्थिती निर्माण झाली होतीगतवर्षी संपूर्ण पावसाळ्यात गावचा वांगीरा ओढा वाहण्याइतका पाऊस पडला नाही

अरुण बारसकर

बीबीदारफळ : खळखळण्यासारखा पाऊस पडला नाही म्हणून वांगीरा ओढाही वाहिला नाही. पाण्याचा दुष्काळ पडल्याची जाणीव झाली अन् वांगीकर टिकाव, फावडे, घमेले घेऊन कामाला लागले. केलेल्या कामाचे बक्षीस तर मिळालेच शिवाय जेमतेम पावसामुळे बंद हातपंप सुरू झाले व विहिरींची पाणीपातळीही वाढली.

उत्तर सोलापूर तालुक्यात आजतरी पाण्याचा दुष्काळ हटलेला नाही. कारण पुरेसा पाऊस पडलेला नाही. मागील वर्षीही अशीच भीषण परिस्थिती निर्माण झाली होती. अन्य गावांप्रमाणे वांगी गावातही पाण्याची स्थिती. गतवर्षी संपूर्ण पावसाळ्यात गावचा वांगीरा ओढा वाहण्याइतका पाऊस पडला नाही. यामुळे पाण्याची पातळी खोलवर गेली. काही तरी केले पाहिजे हा विचार सुरू असताना सत्यमेव जयते पानी फाउंडेशनच्या कामाची चर्चा सुरू झाली. कारण शेजारच्या भागाईवाडी, वडाळा व इतर गावांच्या एकजुटीने होणारा गावाचा विकास वांगीकरांना दिसत होता.

वांगीतील काही युवक-महिला प्रशिक्षण घेऊन आले. प्रशिक्षणात गावकºयांच्या श्रमदानातून सरकारच्या कामातून गाव बदलतंय ही धारणा झालेली. आपणही वांगीरा ओढ्याचा फायदा घ्यायचा या ईर्षेने प्रशिक्षणाला गेलेले तरुण पेटले होते. त्यांनी २०-२५ गावकºयांना सोबत घेत ८ एप्रिलला कामाचा श्रीगणेशा केला. पानी फाउंडेशनचे प्रशिक्षित पाणी अडविण्याची शास्त्रोक्त पद्धत सांगत असत. कसा तरी एप्रिल महिना सरला व मे महिना सुरू झाला. 

गावाच्या परिसरातील पाण्याचे स्रोत कोरडे पडले. ५०० फूट खोलीचे बोअरही बंद झाले तर ७०० फूट खोलीचा एखादा बोअर उचक्या देत कधी-कधी पाणी फेकू लागला. हे चित्र आपणच बदलू शकतो, ही पक्की धारणा झालेले गावकरी जोमाने कामाला लागले. शासनाची कामे, गावकºयांचे श्रमदान, सामाजिक संस्था व कंपन्यांनीही हातभार लावल्याने पाणी अडविण्याची कामे झाली.

शोषखड्ड्यांचा झाला फायदा- पावसाळा सुरू झाला अन् वांगी परिसरात रिमझिम पाऊस पडू लागला. शेतात पाणी अडविण्याची तर गावात शोषखड्ड्याची कामे झाली. तीन-चार पाऊस बºयापैकी पडला व पाणी थळथळले. जमिनीत पाणी मुरले व जिरलेही. - शोषखड्ड्यामुळे गावातील बंद पडलेले पाच हातपंप सुरू झाले तर पाणीपुरवठा बोअरचे पाणी वरती आले आहे. कोरड्या पडलेल्या विहिरींनाही आता पाणी आले आहे. वांगीरा ओढ्यालगतच्या विहिरीत तर पाण्यात चांगली वाढ झाली आहे.

या वर्षी २२९ मि.मी. पाऊस पडला आहे. पडलेल्या पावसाचा फायदा पाणीपातळी वाढण्यासाठी झाला आहे. आणखीन चांगला पाऊस पडला तर दुष्काळ हटेल. पाणी फाउंडेशनच्या निमित्ताने केलेल्या कामामुळे गावाचा तालुक्यात प्रथम क्रमांक आला व पाणीही अडले.- किसन गायकवाड वॉटर कप प्रशिक्षणार्थी

टॅग्स :SolapurसोलापूरWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धाwater shortageपाणीकपातgram panchayatग्राम पंचायतSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषदSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय