यामुळे तालुक्यातील जनतेला चांगलाच फायदा होणार हे खरे. मात्र, गेल्या आठवड्यात पावसाने सर्वदूर हजेरी लावल्याने कुरनूर धरण ओव्हरफ्लो झाले आहे. धरणाचे तीन दरवाजे उघडले आहेत. हे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी येणारे पर्यटक सेल्फी काढणे धोकायदायक ठरू लागले आहे. याकडे प्रशासनाचंही दुर्लक्ष आहे.
------------
पर्यटनाला जा पण काळजी घ्या
- कुरनूर धरणावर पर्यटनाला जाताना अक्कलकोट शहरातून राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस, खासगी वाहने उपलब्ध आहेत. याशिवाय शहरातून दुचाकीवरुनही धरणावरील धबधब्यापर्यंत पोहचू शकता.
सुरक्षा रक्षकच नाहीत
तालुक्यातील हजारो पर्यटक निसर्गरम्य परिसर पाहण्यासाठी येत आहेत. काही उत्साही मंडळी धरणाच्या दरवाजासमोर धोकादायक पद्धतीने सेल्फी काढण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, याकडे लक्ष देण्यासाठी सुरक्षारक्षकच नाहीत. याठिकाणी ना सुरक्षारक्षक, ना सूचना फलक यामुळे हकनाक बळी जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
-----
जबाबदारी कोणाची?
सध्या कुरनूर धरण ओव्हरफ्लो झाले आहे. धरणात क्षमतेपेक्षा जास्त पाणी येत आहे. दरवाजे उघडले असले तरी दरवाजांवरून पाणी वाहत आहे. अशा प्रसंगी पर्यटकांची गर्दी लक्षात घेता धरणावर सुरक्षारक्षक असणे गरजेचे आहे. याठिकाणी सुरक्षारक्षकच नसल्याने धोका निर्माण झाला आहे, ही बाब लक्षात घेऊन वरिष्ठांकडे सुरक्षारक्षकांची मागणी केली आहे. लवकरच नेमणूक करू.
- प्रकाश बाबा, उपविभागीय अभियंता, बोरी मध्यम प्रकल्प
----
पर्यटनाला जा मात्र काळजी घ्या
- पावसाळ्यात पर्यटनाला जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. अशावेळी दुर्घटना टाळण्यासाठी कुटंबातील व्यक्ती अथवा मित्रांना सोबत घ्या. पावसाळ्याचे दिवस असल्याने नरम कपडे सोबत घ्यावेत.
- धोकादायकरित्या सेल्फी काढण्याचा मोह टाळावा. आरोग्याच्या दृष्टीने सोबत सुरक्षितता म्हणून आपली रुटीनची औषधे बाळगावीत. सोबत शुद्ध पाणीच वापरावे जेणेकरुन व्हायरल इन्फेक्शन टाळता येईल.
- रक्तदाब, मधूमेही रुग्णांनी अशा ठिकाणी जाणे टाळावे. गेल्यास दक्षता बाळगावी.
110921\20201014_114120.jpg
कुरनूर धरणातुन पाणी वाहत असतानादेखील जीव धोक्यात घालून फोटो काढून घेताना युवकवर्ग