या गावातील दलितवस्ती गावठाण विभागातील डीपी १५ दिवसांपासून बंद असल्याने या भागातील नागरिकांना अंधारात रहावे लागत आहे. याची झळ सर्वसामान्य लोकांना बसत आहे. याबाबत अनेकवेळा संपर्क करूनही त्याची कोणीही दखल घेतली जात नाही. याबाबत उपकार्यकारी अभियंता ग्रामीण उपविभाग बार्शी यांना समक्ष भेटून निवेदन देऊन लाइट सुरळीत करण्याची मागणी केली.
नवीन कनेक्शन वाढले असून, नवीन ६३ केव्हीची डीपी बसविण्याचे व ज्यांचे अनधिकृत कनेक्शन असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे उपकार्यकारी उपअभियंता अरविंद भाग्यवंत यांनी सांगितले. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भैरवनाथ चौधरी, नितीन पाटील, किरण खुरंगळे, तुषार बारवकर, विश्वनाथ बारवकर, नितीन सरवदे व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.