आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ११ : सोलापूर विमानतळावर अडसर ठरणारी श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सहवीजनिर्मिती प्रकल्पाच्या चिमणी पाडकामास तुर्तास स्थगिती मिळाली आहे़ दरम्यान, येत्या तीन महिन्यात पर्यायी व्यवस्था करू असे लेखी हमीपत्र जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना दिल्याचे सांगण्यात आले़ विमानसेवेस अडथळा ठरणाºया सिध्देश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडकामास शुक्रवारी सुरूवात करण्यात आली होती़ मात्र शेतकºयांच्या तीव्र विरोधामुळे हे पाडकाम थांबले़ दरम्यान, कारखाना सभागृहात जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, पोलीस आयुक्त महादेव तांबळे, कारखान्याचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्यात बैठक झाली़ या बैठकीत येत्या तीन महिन्यात पर्यायी व्यवस्था करून चिमणी पाडकाम करू असे लेखी हमीपत्र दिले असल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिली़ त्यामुळे सिध्देश्वरची चिमणी पाडकामास तुर्तास स्थगिती मिळाली आहे़
सिध्देश्वर साखर कारखान्याच्या चिमणी पाडकामास तुर्तास स्थगिती, पर्यायी व्यवस्था करण्याचे कारखान्याचे जिल्हाधिकाºयांना हमीपत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 7:31 PM