मागील चार वर्षांपूर्वी सातत्याने दुष्काळाच्या छायेमध्ये असणाऱ्या मोहोळ तालुक्यामध्ये मागील वर्षापासून समाधानकारक पाऊस पडत असल्याने पाण्याची पातळी वाढलेली आहे, अशा परिस्थितीत चालूवर्षी मोहोळ मंडलमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यांमध्ये सर्वत्र पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. दि. २६ रोजी रात्री मोहोळ परिसरासह नरखेड परिसरात पडलेल्या पावसामुळे सीना नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले असून आष्टे-कोळेगाव बंधाऱ्यावरून पाणी वाहिले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या मोटारी पाण्यामध्ये वाहून गेल्या. तर नदीकाठच्या पिकाचे नुकसान झाले आहे. महसूल विभागाच्या माध्यमातून सीना नदीकाठच्या शेतकऱ्यांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे
फोटो .. मोहोळ तालुक्यातील आष्टे-कोळेगाव बंधाऱ्यावर पाणी वाहत असल्याने जीव मुठीत धरूनच बंधाऱ्यावरून ये-जा करीत आहेत.