पुण्याच्या धरणातून उजनीला पाणी देता येणार नाही- अजित पवार
By बाळकृष्ण दोड्डी | Published: February 3, 2024 02:10 PM2024-02-03T14:10:41+5:302024-02-03T14:10:50+5:30
पुणे व आसपास परिसरातील लोकसंख्या लक्षात घेता पुणे परिसरतील धरणातून उजनीत पाणी सोडणे वास्तवात शक्य नाही.
सोलापूर : यंदा उजनी धरण मायनस मध्ये गेली आहे. फेब्रुवारी नंतर सोलापुरात पाण्याची भीषण टंचाई निर्माण होणार आहे. वेळ पडल्यास पुण्याच्या धरणातून उजनीत पाणी सोडणार का असे पत्रकारांनी अजित पवार यांना विचारले असता त्यांनी अप्रत्यक्षरीत्या पाणी देण्यास नकार दिला.
ते म्हणाले, पुणे व आसपास परिसरातील लोकसंख्या लक्षात घेता पुणे परिसरतील धरणातून उजनीत पाणी सोडणे वास्तवात शक्य नाही .उजनी धरणातील पाण्याचे नियोजन चुकल्याचे सांगत यास कालवा सल्लागार समिती जबाबदार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. अजित पवार हे सोलापूर दौऱ्यावर असून दरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना उजनीच्या स्थितीबद्दल माहिती दिली.