शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
2
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोणता मुद्दा यावेळी ठरणार निर्णायक?
3
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
4
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र
5
'टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ४-० ने जिंकणार नाही...', सुनील गावसकर यांचे धक्कादायक भाकीत
6
रणजी क्रिकेट: पृथ्वी शॉ याला मुंबईच्या संघात स्थान नाहीच, श्रेयसचं पुनरागमन
7
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
8
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
9
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
11
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
12
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
13
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
14
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
16
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
17
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
18
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
19
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
20
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...

सोलापुरवर जलसंकट कोसळणार ? पाकणी जलशुद्धीकरण केंद्रातील दोन पंप जळाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 2:03 PM

सोलापूर : महापालिकेच्या पाकणी जलशुद्धीकरण केंद्रातील सहा पंपांपैकी दोन विद्युतपंप जळाले असून, आता तिसरा पंप जळाल्यास सोलापूरवर पुन्हा जलसंकट ...

ठळक मुद्देउजनी जलवाहिनीवरून येणारे पाणी शुद्ध करण्यासाठी पाकणी येथे जलशुध्दीकरण केंद्र आहेमहापालिकेच्या पाकणी जलशुद्धीकरण केंद्रातील सहा पंपांपैकी दोन विद्युतपंप जळाले आता तिसरा पंप जळाल्यास सोलापूरवर पुन्हा जलसंकट कोसळण्याची शक्यता

सोलापूर: महापालिकेच्या पाकणी जलशुद्धीकरण केंद्रातील सहा पंपांपैकी दोन विद्युतपंप जळाले असून, आता तिसरा पंप जळाल्यास सोलापूरवर पुन्हा जलसंकट कोसळण्याची शक्यता आहे. 

उजनी जलवाहिनीवरून येणारे पाणी शुद्ध करण्यासाठी पाकणी येथे जलशुध्दीकरण केंद्र आहे. उजनी पंपगृहातून पंपिंग केलेले पाणी चिखली टॉवरजवळील बीपीटीपर्यंत आणले जाते. बीपीटीतून दाबाने पाणी जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत येते. जलशुद्धीकरण केंद्रात शुद्ध केलेले पाणी कोंडी एमबीआरपर्यंत (उंचावरील टाकी) पोहोचविण्यासाठी पाकणी जलशुद्धीकरण केंद्रात चार पंप सुरू ठेवावे लागतात.

आपत्कालीन परिस्थितीत चार पंप कायम सुरू राहण्यासाठी या ठिकाणी दोन स्टॅडिंग पंप ठेवण्यात आले आहेत. पंप सतत सुरू राहिल्याने व विजेच्या कमी-जास्त दाबाने जळण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रत्येक बारा तासाला एका पंपाला विश्रांती देऊन स्टॅडिंगमधील पंप चालविला जातो. शहराला व्यवस्थित पाणीपुरवठा होण्यासाठी चार पंप कायम सुरू राहणे गरजेचे आहे.

तीन आठवड्यांपूर्वी या केंद्रातील दोन पंप जळाले आहेत. त्यामुळे सध्या चार पंप सतत सुरू आहेत. यातील एक पंप जर नादुरूस्त झाला तर शहरावर पुन्हा जलसंकट कोसळणार अशी स्थिती आहे. तीन पंपांवर पाणी उपसा झाला तर शहराला कमी प्रमाणात पाणीपुरवठा होणार आहे. हिप्परगा तलावातील पाणी बंद झाल्याने भवानीपेठेला २२ दशलक्ष लिटर पाणी उजनी जलवाहिनीवरून दिले जात आहे. त्यामुळे या स्थितीत पाकणी जलशुद्धीकरण केंद्रातील या स्थितीकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे झाले आहे. 

दुरूस्ती अडकली टेंडरमध्ये- जळालेले दोन्ही पंप संबंधित मेकॅनिककडे पोहोच करण्यात आले आहेत. सध्या स्थायी समिती अस्तित्वात नाही. त्यामुळे विनाटेंडर दुरूस्तीच्या खर्चाला सभेची मान्यता घ्यावी लागते. ही मान्यता अडकल्याने मेकॅनिकने पंप दुरूस्तीचे काम हाती घेतलेले नाही ही वस्तुस्थिती असल्याचे विश्वसनीय सूत्राकडून सांगण्यात आले़ 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाWaterपाणीwater shortageपाणीटंचाईUjine Damउजनी धरण