शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
3
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
5
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
6
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
7
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
8
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
9
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
10
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
11
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
13
दोन ठिकाणी मतदान कार्ड; तुरुंगवास होऊ शकतो मतदारराजा!
14
दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी, भाजपचे नेते अनिल झा 'आप'मध्ये सामील
15
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या त्या टीकेमुळे शंभुराज देसाई संतप्त, दिलं असं प्रत्युत्तर, म्हणाले...
16
"शरद पवारांना हिंदूंबद्दल बोलण्याची भीती वाटते?", व्होट जिहादवरुन किरीट सोमय्या संतापले
17
Virat Kohli Glenn McGrath, IND vs AUS 1st Test: विराट कोहलीवर दबाव कसा आणायचा? 'द ग्रेट' ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दिला 'कानमंत्र'
18
नात्याला काळीमा! ७ महिन्यांच्या गरोदर महिलेची सासरच्यांनी केली हत्या, २५ तुकडे अन्...
19
नाकाबंदीत थरार! नागपुरात कारचालकाने पोलीस अधिकाऱ्याला फरफटत नेले; सेंट्रल एव्हेन्यूवरील घटना
20
मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल

पाणीपट्टीत ५० टक्के कपात

By admin | Published: July 19, 2014 12:57 AM

युजर चार्जेसला विरोध: महापालिकेचे १०७८ कोटींचे अंदाजपत्रक

सोलापूर : महापालिका आयुक्तांनी सादर केलेल्या ९६९ कोटींच्या बजेटमध्ये १०९ कोटींची वाढ करून मनपा सर्वसाधारण सभेपुढे २०१४-१५ या सालाचे १०७८ कोटी ५२ लाख १७ हजारांचे शिलकी अंदाजपत्रक मनपा सभेत शुक्रवारी रात्री साडेदहा वाजता बहुमताने मंजूर करण्यात आले. परिवहन समिती व शिक्षण मंडळाचे बजेट नंतर सादर होणार आहे. महापौर अलका राठोड यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी दुपारी अर्थसंकल्पीय सभा सुरू झाली. दुपारी चार वाजता स्थायी समितीचे सभापती बाबा मिस्त्री यांनी अर्थसंकल्प मांडला. यामध्ये कोणतीही करवाढ व दरवाढ सुचविण्यात आली नाही. त्यानंतर सभागृहनेते महेश कोठे यांनी पाणीपुरवठ्यासह एकूण १०७८ कोटी ५२ लाख १७ हजारांचे अंदाजपत्रक सभेपुढे ठेवले तर विरोधकांतर्फे पांडुरंग दिड्डी यांनी महसुली जमा-खर्च शिलकेसह ४२४ कोटी २४ लाख व भांडवली ६३६ कोटी ६२ लाखांचे बजेट उपसूचनेद्वारे मांडले. त्यानंतर सुरू झाली भाषणबाजी. सुरेश पाटील यांनी प्रशासनाच्या भरवशावर सत्ताधाऱ्यांनी आकडेमोड करून बोगस अंदाजपत्रक सादर केल्याचा आरोप केला. अंदाजपत्रकाचा पंचनामा करताना कित्येक खात्यातील रकमांतील हिशोबाचा घोळ त्यांनी सभागृहाच्या निदर्शनाला आणून दिला. बजेट खातेप्रमुखांकडून बनवून घेतले की बापूकडून, असा सवाल करीत हद्दवाढ भागात व एलबीटीतील उत्पन्नाचा हिशोब त्यांनी मांडला. पन्नास टक्के पाणीपट्टी माफ करण्याचा निर्णय घेतला; पण यातील तुटीचा हिशोब मांडतानाही घोळ झाल्याचे त्यांनी निदर्शनाला आणून दिले. प्रत्यक्षात नळांची संख्या व थकबाकी, वसूल कर यातील आकडेवारीत मोठी तफावत आहे. महापालिकेत ५ हजार ३६ कर्मचारी मंजूर असताना १ हजार ३६ पदे रिक्त झाली; पण बजेटमध्ये वेतनाचा खर्च धरताना सर्व कर्मचाऱ्यांचा हिशोब धरला गेला. गेल्या चार वर्षांपासून हा घोळ घातला जात आहे. याला जबाबदार असणाऱ्या प्रशासनातील अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी त्यांनी मागणी केली. अनिल पल्ली यांनी अंदाजपत्रकाचे स्वागत केले; पण त्यातील वेगवेगळ्या मुद्द्यांवर धारेवर धरले. आनंद चंदनशिवे, मनोहर सपाटे, भीमाशंकर म्हेत्रे, अशोक निंबर्गी, रोहिणी तडवळकर, कुमूद अंकाराम, प्रवीण डोंगरे, नरसूबाई गदवालकर यांनी अंदाजपत्रकावर मत मांडले. अ‍ॅड. यू. एन. बेरिया यांनी कुठलीही करवाढ व दरवाढ नसलेल्या अंदाजपत्रकाचे स्वागत केले. महाापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रशासनाने बोगस नळ, अनधिकृत बांधकामे शोधमोहीम घ्यावी, अशी सूचना मांडली. आयुक्तांनी येणाऱ्या आर्थिक वर्षासाठी महसुली व पाणीपुरवठ्यासाठी ३९८ कोटींचे उत्पन्न ग्राह्य धरले असून, सभेने यात ५८ कोटींची वाढ करून हे उत्पन्न ४५६ कोटींचे धरले आहे. महसुली आणि भांडवली तसेच शासन निधी याचा विचार करता मनपाचे बजेट १०७८ कोटींवर नेण्यात आले आहे. गतवर्षात ३०४ कोटी वसुली झाली. त्यात एलबीटीचे १०० कोटी आहेत. त्यामुळे एलबीटी रद्द करताना शासनाने चांगला पर्याय द्यावा, अशी मागणी मांडली. हद्दवाढ भागातील विनापरवाना मिळकतीचा शोध घेऊन त्याच्या माध्यमातून ५ कोटी उत्पन्न वाढेल, असे गृहीत धरले आहे. त्याचबरोबर शासनाने एनए रद्द केल्याने गुंठेवारी वेगाने होईल. फ्रंट मार्जीन असलेले सोडून इतर विनापरवाने बांधकाम नियमित केल्यास उत्पन्न वाढणार आहे. पाण्याचे नियोजन होण्यासाठी यापुढे नवीन कनेक्शन देताना मीटर सक्तीचे करण्यात यावे, असे सुचविले आहे. मिळकतदारांना मीटरप्रमाणेच बिल द्यावे, त्याला कोणतीही मर्यादा असता कामा नये, पूर्वीच्या मिळकतदारांना मीटर घेण्यासाठी अनुदान देण्याची शिफारस केली आहे. स्मशानभूमी सुधारणेसाठी ४ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. प्रत्येक झोनला २ टँकरप्रमाणे १० नवीन टँकर खरेदी करण्यात येणार आहेत. यासाठी २ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. केंद्र योजनेतून पाच दवाखाने अपग्रेड करण्यात येणार असून, यापुढे महापालिकेचे दवाखाने कोणत्याही खासगी संस्थांना देण्यात येऊ नयेत, अशी शिफारस करण्यात आली आहे. शहरात जड वाहनांमुळे अपघात होत आहेत. त्यामुळे नगरोत्थान योजनेतून रिंगरुट रस्त्याच्या कामाला प्राधान्य देण्यात आले आहे. झोपडपट्टी विभागाचे संगणकीकरण, काम समाधानकारक नसल्याने सफाईचा ठेका दिलेल्या समीक्षाचा ठेका रद्द करावा, कर्मचाऱ्यांना संगणक शिक्षण सक्तीचे करावे, अशा शिफारशी केल्या आहेत. --------------------------नळधारकांना होणार फायदागेल्या वर्षभरात तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात आल्यामुळे पन्नास टक्के पाणीपट्टी आकारण्यात यावी, अशी मागणी होत होती. विरोधकांनीही हा प्रश्न लावून धरला. स्थायी समितीनेही पन्नास टक्के पाणीपट्टीची शिफारस केली होती. सभागृह नेते महेश कोठे यांनी हा विषय मांडला. प्रशासनाने याची अंमलबजावणी करावी, अशी सूचना केली. याचा फायदा असा होईल. घरगुती पाव इंची कनेक्शन : ४६,२६३, मीटर : ३४१, अर्धा इंची : ४३,८३४, पाऊण इंची : ५२६, बिगर घरगुती अर्धा इंची खासगी नळ : १६६९, पाऊण इंची : २३४. ---------------------जिल्हाधिकाऱ्यांची उपस्थिती...गतवेळेस आयुक्त नाहीत म्हणून महापालिकेची अर्थसंकल्पीय सभा तहकूब करण्यात आली होती. त्यामुळे आजच्या सभेला प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम यांनी हजेरी लावली. सकाळची सभा दुपारी चार वाजता सुरू झाली. या सभेसाठी महापौरांसाठी खास खुर्ची आणण्यात आली होती. जुन्या सभागृहातील मानाच्या खुर्चीची दुरुस्ती करून इंद्रभवनात सभेपूर्वी दाखल करण्यात आली. महापौर राठोड यांचा हा तिसरा अर्थसंकल्प होता. कोणतीही करवाढ व दरवाढ नसलेल्या या अर्थसंकल्पावर फारशी वादळी चर्चा झाली नाही. प्रशासनातील कर्मचाऱ्यांनी बनविलेला अर्थसंकल्प अशी टीका करून सुरेश पाटील यांनी उत्पन्न वाढीकडे लक्ष वेधले.