सोलापूर: लांबोटीजवळ सीना नदीच्या कडेला महापालिकेची उजनी-सोलापूर जलवाहिनी फुटली असून, मनपाचे अधिकारी, कर्मचारी दिवसरात्र थांबून दुरुस्तीचे काम करीत आहेत़ रात्री उशिरापर्यंत हे काम सुरूच होते़ उजनी जलवाहिनीला शटडाऊन आणि औजमधील संपत आलेला जलसाठा, औजमध्ये पाणी पोहोचण्यास लागणारा तीन दिवसांचा अवधी यामुळे शहरावर जलसंकट आले आहे़लांबोटी जलवाहिनी जुना लांबोटी टोल नाका येथे फुटली़ जमिनीखालून खूप मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत असल्यामुळे शेतात तळे साचले होते़ त्यामुळे मनपाला ही माहिती कळताच उजनी पंप बंद करण्यात आले होते़ मात्र जलवाहिनीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पाणी असल्यामुळे ते पाणी उपसण्यासाठी खूप विलंब लागला़ जलवाहिनी रिकामी करण्यासाठी एअरवॉल्व्ह उघड्यात आला त्यावेळी सुमारे १०० फुटावर हे पाणी उंच उडत होते़ रात्री दहा वाजले तरीही जलवाहिनीतील पाणी पूर्णपणे उपसले गेले नाही़ कामाच्या ठिकाणी मनपाचे सार्वजनिक आरोग्य अभियंता विजयकुमार राठोड, उपअभियंता चंकेश्वर यांच्यासह जेसीबी, कर्मचाऱ्यांचा फौजफाटा होता़ रात्रभर काम सुरू होते मात्र जमिनीखालील गळती असल्यामुळे काम करण्यास खूप अडथळा होत होता़ -----------------------उजनी-सोलापूर जलवाहिनीला आतील बाजूस अस्तरीकरण नाही़ त्यामुळे ही जलवाहिनी वारंवार फुटते़ गेल्या महिनाभरात तीनवेळा जलवाहिनी फुटली असून वारंवार शटडाऊन घ्यावा लागत असल्यामुळे पाणीपुरवठ्यावर परिणाम होत आहे़-विजयकुमार राठोडसार्वजनिक आरोग्य अभियंता
लांबोटीजवळ जलवाहिनी फुटली
By admin | Published: June 13, 2014 12:56 AM