गेल्या आठवड्यात आ. सचिन कल्याणशेट्टी, संबधित विभागाचे अधिकारी आणि पंचक्रोशीतील मान्यवरांच्या उपस्थितीत कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत पाणी सोडण्यासंदर्भात चर्चा झाली होती. यामध्ये धरणाच्या खाली असणाऱ्या गावांचा पाणीपुरवठा व्यवस्थित होण्यासाठी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. यानूसार संबधित विभागाने मंगळवारी सकाळी पाणी सोडण्याची कार्यवाही केली.
यात धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आले आहेत. यातून ६०० क्युसेस पाणी सोडण्यात आले. सध्या धरणात केवळ ८५ टक्के पाणीसाठा आहे. प्रत्येक दरवाजे एक ते दीड इंचने उघडले आहेत. सोडलेले पाणी खालच्या अक्कलकोट, सांगवी,ममदाबाद, निमगाव, सातनदुधनी, रूद्देवाडी, बबलाद, सिंदखेड या बंधाऱ्यात साठवले जाणार आहे.
---
नदीकाठच्या गावांचा पाणीप्रश्न मिटला
ऐन उन्हाळ्याच्या सुरूवातीला प्रशासनाने हा निर्णय घेतल्याने नदीकाठच्या गावांचा पाणीप्रश्न तुर्तास मिटला आहे. यामुळे रब्बी पिकांना फायदा होण्यास मदत होईल. बोरी मध्यम प्रकल्पाचे उपविभागीय अधिकारी प्रकाश बाबा,शाखा अभियंता रोहित मनलोर,कालवा निरीक्षक प्रशांत लोंढे,माजी बिटधारक एन.व्ही.उदंडे,राहूल काळे,स्वामी रोट्टे यांनी पाणी सोडण्याची कार्यवाही केली.
---------------------