शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

खंडित वीजपुरवठ्यामुळे मंगळवेढ्यावर जलसंकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 10:27 AM

शहरातील नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा होत नाही. ऐन उन्हाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ येत आल्याने संताप व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देनगरपालिका पाणीपुरवठा विभागाने खंडित वीज पुरवठ्यामुळे शहरावर जलसंकट ओढत असल्याचे सांगितले.सोलापूर शहराला उजनीतून सोडलेल्या पाण्यामुळे सध्या हा बंधारा पाण्याने भरून घेतला आहे.या बंधाºयात मुबलक पाणी असतानाही मंगळवेढा शहराला सुरळीत पाणीपुरवठा होत नाही.  

मंगळवेढा : शहराला पाणीपुरवठा करणारा उचेठाण को. प. बंधारा फुल्ल भरला असतानाही शहरातील नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा होत नाही. ऐन उन्हाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ येत आल्याने संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, नगरपालिका पाणीपुरवठा विभागाने खंडित वीज पुरवठ्यामुळे शहरावर जलसंकट ओढत असल्याचे सांगितले.

शहराला उचेठाण येथील भीमा नदीवरील बंधाºयातून पाणीपुरवठा केला जातो़ सोलापूर शहराला उजनीतून सोडलेल्या पाण्यामुळे सध्या हा बंधारा पाण्याने भरून घेतला आहे. त्यामुळे या बंधाºयात मुबलक पाणी असतानाही मंगळवेढा शहराला सुरळीत पाणीपुरवठा होत नाही.  

उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे सर्वत्र पाण्याची मागणी वाढली आहे. शिवाय शहरातील हातपंपाला क्षारयुक्त पाणी येत असल्याने त्याचा वापर केवळ कपडे धुण्यासाठीच केला जातो़ पाणी पुरवठ्यातील अनियमतितेबाबत नगरपालिका पाणीपुरवठा विभागाकडे संपर्क साधला असता वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे़ त्यामुळे शहरातील पाण्याच्या टाक्या भरू शकत नाहीत याचा परिणाम पाणीपुरवठा वितरणावर होत असल्याचे सांगण्यात आले. 

शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी उचेठाण जॅकवेल व जलशुध्दीकरण केंद्र येथे स्वतंत्र फिडर बसवण्याची मागणी नगरपालिकेने उपकार्यकारी अभियंता यांच्याकडे लेखी पत्राद्वारे १५ एप्रिल रोजी केली आहे. शहरासाठी ३० लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या ५ टाक्या आहेत. यामध्ये नागणेवाडी येथे (जुनी) ७ लाख लिटर क्षमतेची तर नागणेवाडी येथेच नवीन ६़५० लाख लिटर क्षमतेची दुसरी टाकी बांधण्यात आली आहे. तसेच संभाजीनगर येथे ६़५० लाख लिटर क्षमतेची, सांगोला रोड येथे ६़५० लाख लिटर क्षमतेची, साठेनगर येथे ३़५०  लाख लिटर क्षमतेचे अशा ५ ठिकाणी टाक्या बांधून शहराला पाणीपुरवठा केला जात आहे. यामध्ये प्रतिदिनी ३० लाख लिटर पाणी नदीपात्रातून उचलले जाते आहे. शहरामध्ये जवळपास ३३५० बिगर मीटरचे नळ कनेक्शन आहेत़ प्रति व्यक्ती, प्रतिदिनी १३५ एल. पी. सी. डी. पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या उन्हाळा पाण्याची मागणी होत आहे़ 

स्वतंत्र फिडर बसविण्याची केली मागणी- मंगळवेढा शहराला पाणीपुरवठा करणाºया जॅकवेलला सुरळीत वीजपुरवठा होत नसल्याने पाण्याच्या टाक्या भरण्यास अडचण येत आहे. परिणामी शहराला पाणीपुरवठा करण्यात विलंब होत आहे. स्वतंत्र फिडर बसविण्यासाठी वीज वितरणचे उपकार्यकारी अभियंता यांना लेखी पत्र दिले आहे. स्वतंत्र फिडर कार्यान्वित झाल्यास नित्यनियमाने शहराला पाणीपुरवठा होईल. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन नगरपालिका पाणीपुरवठा अभियंता अजय नरळे यांनी केले आहे़

मंगळवेढा नगरपालिकेकडून उचेठाण येथील जॅकवेल व जलशुध्दीकरण केंद्रास स्वतंत्र फिडर बसविण्यासाठी मागणी आली आहे़ त्यानुसार त्याचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. - सत्यजित आमरे, सहायक अभियंता, शहर विभाग

भीमा नदीच्या पात्रात पाणी असतानाही शहराला सुरळीत पाणीपुरवठा होत नाही़ त्यामुळे पाण्यासाठी भर उन्हात भटकंती करावी लागत आहे. शहरामध्ये हातपंपाला क्षारयुक्त पाणी असल्यामुळे ते पिण्यायोग्य नाही़ परिणामी पिण्याचे पाणी कोठून आणायचे असा प्रश्न आहे. - शिवाजी माळी,नागरिक 

टॅग्स :Solapurसोलापूरdroughtदुष्काळwater shortageपाणीटंचाईmahavitaranमहावितरण