काशिनाथ वाघमारे, सोलापूर : निरा खोऱ्यात होणाऱ्या तुरळक पावसामुळे खोऱ्यातील धरणांची पूर्ण क्षमतेने भरण्याची वाटचाल सुरू झाली आहे. ‘थेंबे थेंबे तळे साचे’ म्हणीप्रमाणे आज निरा खोऱ्यातील वीर, भाटघर, निरा-देवघर व गुंजवणी या चार धरणांनी सरासरी सत्तरी ओलांडली. धरणावर अवलंबून असणाऱ्या पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील भागांचा पिण्याचा व सिंचनाचा पाणीप्रश्न सुटला आहे.
गेल्या पंधरवड्यापासून निरा खोऱ्यातील वीर, भाटघर, निरा-देवघर, गुंजवणी या चार धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाच्या हलक्या सरी कोसळत राहिल्या. चारही धरणांच्या पातळीत वाढ होत आहे. गेल्या दहा दिवसांपूर्वी २० जुलैला चारही धरणांतील एकूण पाणीसाठा ४० टक्के म्हणजे १९ द.ल.घ.मी. होता.
त्यानंतर २५ जुलैला तो ६० टक्के म्हणजे २९ द.ल.घ.मी. इतका पाणीसाठा होता. आज तो ७० टक्के म्हणजे ३४ द.ल.घ.मी. एवढा झाला. असाच पाऊस राहिला तर १० ऑगस्टपर्यंत चारही धरणांची पातळी १०० टक्के पूर्ण क्षमतेने भरतील.चार धरणांची आजची परिस्थिती -● वीरआजचा पाऊस ०० मिलिमीटर१ जून २०२३ पासून आजखेर पाऊस १०६ मिलिमीटरउपयुक्त पाणीसाठा ७:०४४ द.ल.घ.मी.एकूण टक्केवारी ७४.८८ टक्के● भाटघरआजचा पाऊस ०८ मि.मी.१ जून २०२३ पासून आजअखेर पाऊस ३७० मि.मी.उपयुक्त पाणीसाठा १५.२२७ द.ल.घ.मी.एकूण टक्केवारी ६४.७९ टक्के.● निरा-देवघरआजचा पाऊस ३० मि.मी.१ जून २०२३ पासून आजखेर पाऊस १२९४ मि.मी.उपयुक्त पाणीसाठा ९.५८५ द.ल.घ.मी.एकूण टक्केवारी ८१.७२ टक्के.● गुंजवणीआजचा पाऊस २० मि.मी.१ जून २०२३ पासून आजखेर पाऊस ८८९ मि.मी.उपयुक्त पाणीसाठा २.४४३ द.ल.घ.मी.एकूण टक्केवारी ६६.२० टक्के