शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
4
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
5
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
6
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
7
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
8
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
9
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
10
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
11
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
12
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
13
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
14
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
15
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
16
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
17
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
18
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
19
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
20
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय

सोलापूरात विस्कळीत पाणीपुरवठा, चार दिवसाआड येतेय पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 12:46 PM

सोलापूर : पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी बैठक घेऊन पुढील आठवड्यापासून तीन दिवसाआड पाणीपुरवठ्याचे आदेश दिल्यावर महापालिकेचे सार्वजनिक आरोग्य अभियंता गंगाधर दुलंगे रजेवर गेले आहेत. विस्कळीत पाणीपुरवठ्यात सातत्य असून, नवीन नियोजन पावसाळ्यात होण्याची चिन्हे दिसत आहेत. शहरात चार ते पाच दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. नगरसेवकांनी त्रागा व्यक्त ...

ठळक मुद्देउजनीहून दररोज ७0 दशलक्ष लिटर पाणी शहरात येतेशहरात चार ते पाच दिवसाआड पाणीपुरवठा होत आहेशहरात तिन्ही उद्भवातून येणाºया पाण्याची परिस्थिती वाईट

सोलापूर : पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी बैठक घेऊन पुढील आठवड्यापासून तीन दिवसाआड पाणीपुरवठ्याचे आदेश दिल्यावर महापालिकेचे सार्वजनिक आरोग्य अभियंता गंगाधर दुलंगे रजेवर गेले आहेत. विस्कळीत पाणीपुरवठ्यात सातत्य असून, नवीन नियोजन पावसाळ्यात होण्याची चिन्हे दिसत आहेत. 

शहरात चार ते पाच दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. नगरसेवकांनी त्रागा व्यक्त करण्यास सुरुवात केल्यावर पालकमंत्री देशमुख यांनी पुढाकार घेऊन पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करण्याचे आदेश दिले. पण त्यानंतरही शहरात तिन्ही उद्भवातून येणाºया पाण्याची परिस्थिती वाईट असल्याचे चित्र समोर येत आहे.

उजनीहून दररोज ७0 दशलक्ष लिटर पाणी शहरात येते. पाकणी जलशुद्धीकरण केंद्रातून शुद्धीकरणानंतर हे पाणी वितरणासाठी शहराकडे पाठविले जाते. चिंचोळी एमआयडीसीला यातील साडेपाच दशलक्ष लिटर पाणी जाते. त्यानंतर केगाव, बाळे येथील टाक्यांना पाणी दिले जाते. तेथून अवंतीनगर, नेहरुनगरपर्यंतच्या टाक्या भरून पाणी वितरण केले जाते. हिप्परग्यातून पाणी कमी येत असल्याने भवानीपेठ जलशुद्धीकरण केंद्राकडे यातील १५ दसलक्ष लिटरची एक जलवाहिनी टाकण्यात आली आहे. पण या जलवाहिनीतून पाणी गिरणीला पाणी येतच नसल्याचे दिसून येत आहे. वाटेत थेट कनेक्शन देऊन हे पाणी पळविण्यात आल्यामुळे हद्दवाढ भागाला याचा मोठा फटका बसत आहे.जलशुद्धीकरण केंद्रातील व वितरणाच्या इतर टाक्या भरल्यावर टाकळी व उजनी पंपहाऊसमधील चौथा पंप दर सहा तासांनी बंद करावा लागतो. अशी स्थिती असताना पाईपलाईनमध्ये बरेच पाणी जाते असे दाखवून अशा थेट कनेक्शनला संरक्षण देण्यात येत आहे. चिंचपूर बंधाºयातील पातळी खालावल्यावर औज बंधाºयातील सर्व पाणी खाली घेण्यात आले आहे. यामुळे औज बंधाºयातून शेतीसाठी होणारा उपसा थांबला आहे. आता टाकळी इंटेकजवळ ५ जूनपर्यंत पुरेल इतपत पाणीसाठा आहे. याबाबत पाणी पुरवठा विभागाने जिल्हाधिकाºयांना कळविले आहे. पुढील आठवडाभरात पाऊस न झाल्यास औज बंधाºयातून उजनीतून पाणी सोडण्याशिवाय पर्याय नाही. अशा स्थितीत तीन दिवसाआड पाणीपुरवठा केल्यास हा कालावधी आणखी खाली येणार आहे. एकूणच पुढील आठवड्यात तीन दिवसाआडच्या गणितावर गंडांतर येण्याची चिन्हे दिसत आहेत.  टँकर घोटाळ्याबाबत पळापळ- विभागीय कार्यालय क्र. २ मधील टँकर घोटाळ्याबाबत नगरसेवक नागेश वल्याळ  यांनी संबंधित अधिकाºयांच्या लागेबांधे उघड केले आहेत. याबाबत आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांना लेखी पुरावे दिले आहेत. त्यानंतर अधिकाºयांमध्ये पळापळ सुरू झाली आहे. भवानीपेठ येथील रजिस्टर गायब झाल्याचे नगरसेवक वल्याळ यांनी सांगितले. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका