मंगळवेढ्याच्या दक्षिण भागातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी दर वर्षी होणारे हाल पाहता दिवंगत आमदार भारत भालके यांनी सरकारकडे पाठपुरावा केला व ही योजना मंजूर करून घेतली. या योजनेला ७० कोटींचा खर्च आला होता. या योजनेमुळे दक्षिण भागातील ४० गावांना पाणी मिळाले. आता ही योजना चालविण्याचा खर्च पाणीपट्टी व वीज बिल हे ग्रामपंचायतीने पाहणे आवश्यक होते. पण भारत भालके यांनी ग्रामपंचायतीवर भार न टाकता चालविली. त्यानंतर सर्व ग्रामपंचायती मिळून शिखर समिती स्थापन करून या योजनेच्या देखभालीसाठी निधीची तरतूद करणे आवश्यक होते, परंतु हे झाले नसल्यामुळे या योजनेच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे ही योजना बंद पडली.
आता विठ्ठल कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके यांनी योजना सुरू करून या भागातील नागरिकांना पाणी मिळण्यासाठी पाठपुरावा केला. त्यानुसार या योजनेसाठी १८ लाखांचा निधी मिळाला. त्यातून तांत्रिक देखभाल वीज बिल व दुरुस्तीसाठी वापरला जाणार आहे.