आॅनलाइन लोकमत सोलापूरअक्कलकोट दि २४ : तालुक्यातील चपळगावच्या पाझर तलावामधून बेकायदेशीरपणे काही शेतकरी पाणी उपसा करीत आहेत. याविरोधात नागरिकांनी चार महिन्यांपासून उपसा बंद करण्याबाबत तक्रारी करूनही याकडे संबंधित विभाग लक्ष देईना़ यामुळे पाणी चोरट्यांचे चांगलेच फावत आहे.चपळगाव शिवारामध्ये पाझर तलाव क्र. १ हे १९७२ च्या दुष्काळात बांधण्यात आले असून, चार महिन्यांपासून काही शेतकरी विनापरवाना पाणी उपसा करीत आहेत. सध्या तलावात केवळ २0 टक्के पाणीसाठा आहे. यातील पाण्यावर ५00 पाळीव प्राण्यांसह जंगली जनावरांचे भवितव्य अवलंबून आहे. असे असतानाही १२ पाईपलाईनद्वारे सहा विद्युतपंप लावून पाणी उपसा सुरू आहे. हे पाणी तलावापासून चार ते पाच कि. मी. अंतरावर नेण्यात येत आहे. यातील पाण्याच्या उपशामुळे फेब्रुवारीमध्ये जनावरांच्या पाण्याचा प्रश्न भेडसावणार आहे. शासकीय अधिकाºयांची अनास्था व पाणी चोरांची मुजोरी पाहून मनोज कांबळे, ए. एम. पटेल, राम सोनार, कल्लप्पा सराटे, दिलीप गजधाने, संतोष कुलकर्णी, सुरेश भंगे, मडोळप्पा बाणेगाव, दयानंद हिरेमठ, कैलास सावळे, युवराज बाणेगाव, श्रीमंत दुलंगे, सतीश पाटील, बसवराज बाणेगाव, संतोष सुतार, शिवानंद अचलेरे, एजाज पटेल, सचिन म्हेत्रे, पंडित पाटील, विजय बिराजदार, चंद्रकांत माशाळे, हणमंत कोळी, एस. एस. गजधाने, परमेश्वर भुसणगे, शीला सावळे यांनी तक्रार करीत उपोषणाचे हत्यार उपसले आहे.--------------------------कागदी घोडे नाचविण्याचे काम...नागरिकांच्या तक्रारींवरून २० नोव्हेंबर २०१७ रोजी गटविकास अधिकाºयांनी पाणी उपसा बंद करण्याचे तर तहसीलदारांनी वीज कंपनीला वीजपुरवठा बंद करण्याचे पत्र दिले. २ आॅक्टोबर रोजी पाणी उपसा बंद करण्याबाबत ठरावही केला. त्यानंतर ग्रामविकास अधिकाºयांनी तत्काळ पाणी उपसा बंद करण्यासाठी संबंधित शेतकºयांना नोटीस बजावली. उपजिल्हाधिकारी, स्थानिकस्तर ल. पा. नेही कार्यवाहीसाठी पुढाकार घेतल्याचे दाखवत फक्त कागदी घोडे नाचविले. पण पाणी उपसा काही बंद झाला नाही.
चपळगाव तलावातून अवैध पाणी उपसा सुरू, ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा: फेब्रुवारीत पाणीटंचाई भेडसावण्याची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 12:41 PM
तालुक्यातील चपळगावच्या पाझर तलावामधून बेकायदेशीरपणे काही शेतकरी पाणी उपसा करीत आहेत. याविरोधात नागरिकांनी चार महिन्यांपासून उपसा बंद करण्याबाबत तक्रारी करूनही याकडे संबंधित विभाग लक्ष देईना़
ठळक मुद्देचार महिन्यांपासून काही शेतकरी विनापरवाना पाणी उपसा करीत आहेतसध्या तलावात केवळ २0 टक्के पाणीसाठा, यातील पाण्यावर ५00 पाळीव प्राण्यांसह जंगली जनावरांचे भवितव्य अवलंबून १२ पाईपलाईनद्वारे सहा विद्युतपंप लावून पाणी उपसा सुरू