शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

उद्योगांना पूर्वपदावर आणण्यासाठी आम्ही सज्ज; मदतही हवी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2020 3:37 PM

सोलापुरातल्या उद्योजकांच्या भावना; आम्ही लढू. नवे नियोजन करू...!!

ठळक मुद्देलॉकडाऊन संपल्यानंतर टेक्स्टाईल उद्योग पूर्वपदावर आणण्यासाठी सर्व उद्योजक प्रयत्नशील राहतीलउद्योग सुरू झाल्यानंतर देश-विदेशातून टेक्स्टाईल उद्योगाला मार्केट असणार की नाही याबाबत येणाºया काळातच माहिती मिळू शकेलभविष्यातील मार्केटवरच टेक्स्टाईल उद्योजक अवलंबून आहेत. उद्योग बंद असल्याने एकूण उलाढाल ठप्प आहे

बाळकृष्ण दोड्डी

 सोलापूर : लॉकडाऊन काळात उद्योगधंदे पूर्णपणे थांबले आहेत. लॉकडाऊन कधी उठेल याबाबत अद्याप अनिश्चितता आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर उद्योग पूर्वपदावर यायला किमान एक वर्षभराचा कालावधी लागेल. आम्ही यातून शंभर टक्के बाहेर पडणे मुश्कील आहे. पण उद्योजक हिंमत हरणार नाहीत. आम्ही लढू. नवे नियोजन करू. याकरिता केंद्र आणि राज्य सरकारकडून पुढील काळात उद्योगासाठी मदतीचे धोरण हवे आहे, अशा भावना सोलापुरातील उद्योजकांनी व्यक्त केल्या आहेत.

 लॉकडाऊन नंतर येणाºया अडचणींचा सामना करण्याचा निर्धार सोलापुरातील उद्योजकांनी केला आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त उद्योजकांनी ह्यलोकमतह्णकडे त्यांचा निर्धार व्यक्त केला आहे. एलएचपी उद्योग समूहाचे कार्यकारी संचालक शरदकृष्ण ठाकरे म्हणाले, आमचे पुरवठादार संपूर्ण देशभरात आहेत. या पुरवठादारांवरच आमची उत्पादन प्रक्रिया अवलंबून असते. पुरवठासाखळी सुरळीत होण्यासाठी चांगली वाहतूक व्यवस्था हवी आहे. सप्लाय चेन पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी तसेच कंपनीत नॉर्मल वर्किंग होण्याकरिता अनेक आव्हाने, अडथळे येतील. यातून आम्ही शंभर टक्के नियोजनरित्या बाहेर पडणे मुश्कील आहे. लॉकडाऊनचा फटका अनेक उद्योजकांना बसणार आहे. अनेक उद्योग बंद पडतील. शेकडो उद्योगाची क्षमता कमी होईल. अनेकांच्या नोकºया जातील. उद्योग क्षेत्र पूर्वपदावर येण्याकरिता याकरिता केंद्र आणि राज्य सरकारकडून उद्योगाच्या मदतीकरिता धोरण आखणे गरजेचे आहे. सरकारी मदत मिळाल्याशिवाय उद्योग पूर्वपदावर येणार नाही. आमच्या प्रयत्नशीलतेला तसेच नियोजनाला सरकारी मदत अपेक्षित आहे. मदत मिळाल्यास आम्ही शंभर टक्के वर्षभरात बाहेर पडू. आमची तयारी आहे.

बालाजी अमाईन्सचे राम रेड्डी सांगतात, सध्या आमचा उद्योग सुरू आहे. लॉक डाऊननंतर उद्योग १00 टक्के पूर्वपदावर येईल. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आम्ही लॉकडाऊन नंतरही आवश्यक ती काळजी घेत आहोत. 

फॅक्टरीत फिजिकल डिस्टन्स तसेच नियमितपणे सॅनिटायझरचा वापर करणार आहोत. कर्मचाºयांना योग्य समुपदेशन होईल. सामाजिक जबाबदारीची जाणीव जागृत राहील. तसेच शासनाकडून उद्योगपूरक धोरण आखणे गरजेचे आहे.

कामगारांना नुकसानभरपाई द्यायला उद्योजकांकडे पैसे नाहीतसोलापूर जिल्हा यंत्रमागधारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम सांगतात, लॉकडाऊन संपल्यानंतर टेक्स्टाईल उद्योग पूर्वपदावर आणण्यासाठी सर्व उद्योजक प्रयत्नशील राहतील. उद्योग सुरू झाल्यानंतर देश-विदेशातून टेक्स्टाईल उद्योगाला मार्केट असणार की नाही याबाबत येणाºया काळातच माहिती मिळू शकेल. भविष्यातील मार्केटवरच टेक्स्टाईल उद्योजक अवलंबून आहेत. उद्योग बंद असल्याने एकूण उलाढाल ठप्प आहे. दीड महिना उद्योग बंद राहिल्याने उद्योजकांचा आर्थिक कणा पूर्णपणे कोलमडून गेला आहे. टेक्स्टाईल उद्योगात ४0 हजारांहून अधिक कामगार आहेत. या सर्व कामगारांना टेक्स्टाईल उद्योजकांकडून ८ दिवसातून एकदा पाचशे ते हजार रुपये अनामत रक्कम दिली जात आहे. उद्योग सुरळीत झाल्यानंतर दिलेल्या अनामत रकमेची कपात करण्यात येणार आहे. कामगारांना नुकसानभरपाई द्यायला सोलापुरातील उद्योजकांकडे पैसे नाहीत. 

टॅग्स :Solapurसोलापूरbusinessव्यवसायjobनोकरीcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस