पंढरपूर/अकलूज: अकलूज येथे शिवरत्न बंगल्याच्या एका बंद खोलीत चर्चा झाल्यानंतर माजी गृहमंत्री सुशील शिंदे, माजी खा. मोहिते पाटील व मी एकत्र आलो आहे, याचा महाराष्ट्रात निश्चित फरक पडणार असल्याचे शरद पवारांनी यांनी सांगितले.
अकलूज (ता. माळशिरस) येथे खा. शरद पवार, विजयसिंह मोहिते-पाटील, सुशीलकुमार शिंदे, शेकापचे नेते जयंत पाटील, अभिजित पाटील, धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या उपस्थित बैठक झाली.
पुढे पवार म्हणाले, सोलापूर हा जिल्हा गांधी-नेहरूंच्या विचारांचा आहे. तीन्ही, चारी पक्षाचे नेते आज उपस्थित आहेत. मोहिते-पाटील यांनी पक्षात येण्याचा निर्णय घ्यावा. धैर्यशील मोहिते -पाटील यांनी माढा लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढावी.
निवडणुकीच्या कलावधीतही ईडीचा प्रभाव वाढत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली म्हणून एका मुख्यमंत्र्यावर कारवाई होते. ही देशातील पहिली घटना आहे असे कधीच झाले नाही. तसेच भाजपाने मागील जाहीरनाम्यातील आश्वासने पाळली नाहीत. आणि नवीन जाहीरनामा सादर केला आहेत.