आचारसंहिता संपल्यानंतर विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समिती बरखास्त करू : अजित पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 09:17 PM2021-04-08T21:17:30+5:302021-04-08T21:18:06+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग
पंढरपूर : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती बरखास्त करुन त्याठिकाणी नवीन समिती नेमण्यात येईल असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
माजी नगरसेवक आदित्य फत्तेपुरकर यांच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रमुख मंडळींची बैठक घेतली होती. यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, माजी आमदार दीपक साळुंखे, माजी नगरसेवक आदित्य फत्तेपुरकर, आ. संजय शिंदे, भगिरथ भालके, लतीब तांबोळी, यवुराज पाटील, सुधीर भोसले उपस्थित होते.
या बैठकीनंतर ह.भ.प. राजेंद्र महाराज मोरे यांनी श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समिती भाजप प्रणित आहे. ही समिती बरखास्त करावी अशी मागणी केली. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले या मागणीवर आचारसंहिता संपल्यानंतर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल.
त्याचबरोबर मंदिर समितीबाबतचा विषय आज पर्यंत का सांगितला नाही, अशी बातचीत पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.