सोलापूर : नवीपेठेतील वाहतूक, सुरक्षा, अतिक्रमण आदी समस्या सोडविण्याबरोबरच रस्ते दुरूस्ती, पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देणे, वाहतूक कर्मचाºयांसह पोलीस बंदोबस्त देण्याबरोबरच आदी सेवा-सुविधा पुरविण्याबाबत पोलिसांनीच लीड घेतलीय़ हे कौतुकास्पद व अभिमानास्पद आहे़ याकामी त्यांना जी-जी मदत लागेल ती मदत आम्ही करणारच, अशी प्रतिक्रिया नवीपेठमधील व्यापाºयांनी व्यक्त केली.
‘लोकमत’ ने नवीपेठेतील समस्यांबाबत वृत्तमालिका प्रकाशित केली. त्यानंतर या वृत्तमालिकेची दखल घेत शहर पोलिसांनी नवीपेठ परिसराची पाहणी केली़ त्यानंतर येथील समस्या सोडविण्यासाठीचा आराखडा तयार केला़ एवढेच नव्हे तर नवीपेठेतील व्यापाºयांच्या समस्या कायमच्याच सोडविण्यासाठी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी व्यापाºयांशी संवाद साधण्यासाठी बैठकीचे आयोजन केले़ या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली़ व्यापाºयांनी पोलिसांना वाहतूक समस्येबरोबरच ग्राहकांसह व्यापारी वर्गाच्या सुरक्षेसाठी उपाययोजना आखाव्यात याबाबतची मागणी केली.
दरम्यान, नवीपेठेतील अनधिकृत हॉकर्स व अतिक्रमण हटविण्याचीही मागणी यावेळी पोलिसांसमोर व्यापाºयांनी केली़ या मागणीनंतर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सर्वच समस्या लवकरात लवकर सोडविल्या जातील त्यासाठी व्यापाºयांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन केले़ त्यानुसार व्यापाºयांनी पोलिसांना सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे बैठकीत सांगितले़ त्यानुसार पोलिसांकडून नवीपेठेतील समस्या सोडविण्याबाबतच्या कामाला गती आली आहे.
महापालिकेनेही समस्यांकडे लक्ष द्यावे- नवीपेठेतील बहुतांश समस्या या सोलापूर महापालिकेतंर्गत आहेत़ अतिक्रमण, अनाधिकृत हॉकर्स, स्वच्छतागृहांची आवश्यकता यासह आदी समस्या व्यापाºयांना भेडसावत आहेत़ जिल्हाधिकारी तथा महापालिकेचे आयुक्त डॉ़ राजेंद्र भोसले यांनी तातडीने लक्ष घालून नवीपेठेतील व्यापाºयांच्या समस्या सोडवाव्यात़
नवीपेठेतील व्यापाºयांच्या समस्या सोडविण्यासाठी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी चांगलेच मनावर घेतले आहे़ त्यानुसार पोलीस प्रशासन पावले उचलत आहे़ लवकरच नवीपेठेत बदल दिसेल़ पोलिसांच्या प्रत्येक कामात व्यापाºयांचे सहकार्य असेल़ नवीपेठेत विविध समस्या व अडीअडचणी असतानाही गुणवत्ता, विश्वासामुळे नवीपेठेतील ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे़- अशोक मुळीक,अध्यक्ष, नवीपेठ व्यापारी असोसिएशन, सोलापूर.
नवीपेठेतील समस्या सोडविण्यासाठी पोलिसांनी प्राधान्य दिले आहे़ त्यादृष्टीने पोलीस प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत़ व्यापाºयांच्या वतीने शक्य तेवढी मदत करण्यात येईल़ महापालिका, पोलीस प्रशासनाने संयुक्त काम केल्यास बºयाच अडीअडचणी सुटतील़ शेवटी नवीपेठच्या समस्या सुटल्यास येथील व्यापार वाढेल अन् नक्कीच महापालिकेच्या तिजोरीत जास्तीचा टॅक्स जमा होईल़ त्यानुसार शहराचा चेहरामोहरा बदलेल़ पोलिसांच्या कामाला आमच्या शुभेच्छा़- विजय पुकाळे,सचिव - नवीपेठ व्यापारी असोसिएशन, सोलापूर
समस्यांची सोडवणूक झाली पाहिजे़ वर्षानुवर्षे त्याच त्या समस्या आहेत़ आता पोलीस या कामांना प्राधान्य देत असतील तर नक्कीच बदल दिसेल असे मला वाटते़ मध्यंतरी रस्ता दुरूस्ती झाली पण ती व्यवस्थित झाली नाही उलट खड्डे जास्त पडले़ महापालिकेने नवीपेठ व्यापाºयांच्या समस्येकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे असे मला वाटते़- भाविन रांभिया, नवीपेठ व्यापारी असोसिएशन, सोलापूर
नवीपेठेतील समस्यांबाबत लोकमतने उठविलेला आवाज हे खरेच कौतुकास्पद आहे़ आपल्या बातम्यांमुळे पोलीस व महापालिका प्रशासनाला जाग आली हे काय कमी झाले का़ पोलिसांनी नवीपेठच्या समस्या कायमच्या सोडविण्यासाठी कठोर नियोजन करायला हवे़ वाहतूक समस्या सोडविण्याबरोबरच हॉकर्सचा प्रश्न कायमचा मिटविण्यासाठी पुढाकार घ्यावा़- प्रकाश आहुजा, नवीपेठ व्यापारी असोसिएशन, सोलापूर
जे नियमात आहे ते पोलिसांनी करावे़ नवीपेठेतील हॉकर्स हटविल्याशिवाय वाहतुकीचा प्रश्न सुटणार नाही़ तात्पुरत्या स्वरूपात कारवाई नको, कायमचा तोडगा काढण्यासाठीच्या उपाययोजना हव्यात़ फायदा कुणाचा, नुकसान कुणाचे याचा विचार न करता पोलीस, महापालिका प्रशासनाने नवीपेठच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावा़ पोलिसांच्या प्रत्येक कामात व्यापाºयांचे पूर्णपणे सहकार्य असेल़- विलासचंद बारड, नवीपेठ व्यापारी असोसिएशन, सोलापूर.
वृत्तमालिका प्रकाशित झाली़़़पाहणी झाली़़़बैठक झाली़़़़आता खºया अर्थाने बदल घडायला हवा़ पोलिसांनी घेतलेल्या सकारात्मक भूमिकेला नवीपेठेतील प्रत्येक व्यापारी सहकार्य करेल़ सामूहिकरित्या निर्णय व सहकार्य असेल तर अशक्य गोष्ट शक्य होणार हे मात्र नक्की़ नवीपेठ व्यापाºयांच्या समस्या सोडविण्यासाठी महापालिकेनेही पुढाकार घ्यायला हवा़- अभय जोशी, नवीपेठ व्यापारी असोसिएशन, सोलापूर
नवीपेठेत पार्किंग स्थळे निर्माण करावीत़ नो व्हेईकल झोन करण्यापेक्षा पार्किंगची संख्या वाढविल्यास वाहतूक समस्या सुटेल़ शिस्त लावावी, वाहतूक कर्मचारी नेमावेत, सुरक्षेसाठी पोलिसांची दिवसातून एकदा किंवा दोनदा गस्त हवी़ पोलिसांच्या प्रत्येक कामात व्यापाºयांची भूमिका सकारात्मक असेल़ शेवटी सोलापूरच्या विकासाच्या दृष्टीने बाजारपेठ स्मार्ट झाली पाहिजे एवढेच आमचे मत आहे़ कोणाचेही नुकसान होणार नाही एवढे मात्र खरे़ - खुशाल देढियाव्हा़ चेअरमन, नवीपेठ व्यापारी असोसिएशन, सोलापूर