करमाळा : तालुक्यातील शिवसेनेचा प्रभाव वाढविण्यासाठी काम करीत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा तालुक्यातील राहिलेली विकासाची सर्व कामे मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही शिवसेनेचे माजी आमदार नारायण पाटील यांनी दिली.
नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सन्मानार्थ करमाळ्याचे आराध्य दैवत आई कमलाभवानी देवी चरणी एक किलो चांदीची तलवार माजी आमदार नारायण पाटील यांच्या हस्ते अर्पण केली.
यावेळी करमाळा पंचायत समितीचे सभापती गहिनीनाथ ननवरे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे, भरत अवताडे, मार्केट कमिटीचे माजी संचालक देवानंद बागल, महिला आघाडीचे तालुकाध्यक्ष प्रियंका गायकवाड, युवा सेनेचे शहर प्रमुख विशाल गायकवाड, उपजिल्हाप्रमुख मयूर यादव, ग्रामपंचायत सदस्य जयराम सोरटे, कमलादेवी ट्रस्टचे अध्यक्ष सोमनाथ चिवटे, सचिव अनिल पाटील व्यवस्थापक गाठे, श्रीराम फलफले, अभय पुराणिक व शिवसैनिक उपस्थित होते.
यावेळी नारायण पाटील म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी समाजसेवेचा प्रचंड डोंगर उभा केला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात जवळपास १४० रुग्णवाहिका मोफत देऊन त्यांनी आदर्श निर्माण केला आहे. आगामी काळात करमाळा तालुक्यातील शिवसेना भक्कम करु. पुन्हा एकदा करमाळा विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकवणार असल्याचे म्हणाले. पुन्हा शिवसेनेकडून निवडणूक लढवणार असल्याचा इरादा स्पष्ट केला.
---
फोटो : ०९ कमलादेवी
कमला देवीच्या चरणी चांदीची तलवार अर्पण करताना माजी आमदार नारायण पाटील