शनिवारी दुपारी राज्याचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी बार्शीत येऊन डिसले यांचा सन्मान केला. यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील फोनद्वारे डिसले गुरुजींचे अभिनंदन केले. राज्याच्या विधिमंडळामध्ये डिसले सरांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडणार असल्याचे दरेकर यांनी स्पष्ट केले.
यावेळी आमदार राजेंद्र राऊत, नगराध्यक्ष आसिफ तांबोळी, माजी नगराध्यक्ष रमेश पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, सभापती अनिल डिसले, भाजपचे तालुकाध्यक्ष मदन दराडे, पंचायत समितीचे सदस्य अविनाश मांजरे, तहसीलदार प्रदीप शेलार, नगरसेवक शरद फुरडे-पाटील, दीपक राऊत, संतोष बारंगुळे, संदेश काकडे विजय चव्हाण आदी उपस्थित होते.
दरेकर यांनी भगवंत मंदिरात जाऊन भगवंतांचे दर्शन घेतले. देवस्थान ट्रस्टच्या वतीने दिलीप बुडुख, सदस्य नाना सुरवसे, आमदार राजेंद्र राऊत, कुंडलिकरव गायकवाड आदी उपस्थित होते.