उजनी धरणातील गाळ ही मोठी संपत्ती आहे. धरणातील गाळ काढण्याच्या निविदा प्रक्रियेवर पुढील एक ते दीड महिन्यात निर्णय घेऊ असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिले.
भाजपचे विधान परिषदेतील आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. उजनी धरणामध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ साचला आहे. हा गाळ मोठी संपत्ती आहे. वाळू मिश्रित गाळ काढला तर आणखी सहा टीएमसी पाणी सोलापूर जिल्ह्याच्या सिंचनासाठी उपलब्ध होईल. राज्य शासन या विषयावर काय करणार, असे मोहिते पाटील यांनी विचारले.
यावर उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, २०१९ मध्ये धरणातील गाळ काढण्याची निविदा काढण्यात आली होती. यासाठी आलेले दर देशातील इतर भागांपेक्षा खूप जास्त होते. दीड महिन्यात यासाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबवू.