करमाळा येथील डॉ. महेंद्र नगरे व रोहिणी नगरे यांची कन्या माधुरी ही पर्ड्यू युनिव्हर्सिटी, लाफाइती, इंडियाना पोलीस, अमेरिका येथे इंजिनिअरिंगमध्ये पीएचडी करीत आहे. दरम्यान गुवाहाटी (आसाम) येथील सौभिक सीतांशु देब याच्याशी ओळख झाली आणि या ओळखीतूनच सौंभिकने माधुरीपुढे लग्नाचा प्रस्ताव मांडला. सध्या सौभिक देब हा सीएटल शिकागो स्टेट अमेरिका येथे इंजिनिअरिंगमध्ये पीएचडी करीत आहे. दोन्ही परिवाराची लग्नाची तयारी असताना कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्याने लग्न लांबत चालले होते आणि शेवटी ऑनलाईन लग्न करण्याचा निर्णय दोन्ही परिवारांनी घेतला. ८ जूनला अमेरिकेतील वेळेनुसार सकाळी ११.३० वाजता तर भारतीय वेळेनुसार रात्री ९ वाजता हा विवाह सोहळा पार पडला.
या लग्न सोहळ्यात वधू-वराचे माता-पिता, नातलग, मित्रमंडळी अशा १६० जणांनी विशेषत: करमाळा व गुवाहाटी येथील वऱ्हाडी मंडळींनी यात सहभाग दर्शविला. याचे सूत्रसंचालन डॉ. नगरे यांचे चिरंजीव केतक नगरे व सुनबाई डॉ. काजल यांनी जर्मनीतून केले. असा एक आगळावेगळा लग्नसोहळा संपन्न झाला.
----
फोटो : २५ करमाळा विवाह
अमेरिकेत ऑनलाईन पद्धतीने लग्न सोहळ्यानंतर प्रमाणपत्रसह सौभिक देब व माधुरी नगरे.