शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

पाणी फाउंडेशनच्या कामावर झाला विवाहसोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2019 12:23 PM

वॉटर कप स्पर्धेतील सोलापूर जिल्ह्यात जलसंधारणाबरोबर मनसंधारणाचाही आगळावेगळा सोहळा

ठळक मुद्देनवरा-नवरीचे श्रमदान चालू असल्याचे पाहून वºहाडी मंडळीदेखील टिकाव, खोºया, पाट्या हातात घेऊन श्रमदानासाठी पुढे सरसावल्याचे चित्र दिसले.विवाह करण्याअगोदर छत्रपती शिवाजी महाराजांची आरती म्हणून जयघोष करीत बोलो मिलके एक साथ दुष्काळाशी दोन हात अशा घोषणा देण्यात आल्या.

अमर गायकवाड 

माढा : आयुष्यातील महत्त्वाचा भाग असलेल्या लग्नसोहळ्यात नवदांपत्याने ग्रामस्थांसोबत श्रमदान करीत आयुष्याची सुखद सुरुवात केली. हा विवाहसोहळा शनिवार, दि. २७ रोजी दुपारी पार पडला. स्मशानभूमीच्या जवळील माळरानावर आगळ्यावेगळ्या पद्धतीने लग्नसोहळ्यानंतर हा कार्यक्रम करत आदर्श निर्माण करून देण्याचे काम जामगाव येथील कुमार उत्तम चव्हाण या युवकाने केले. त्याचा लग्नसोहळा मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी येथील अमृता भाऊराव देशमुख हिच्याशी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून सुरू असलेल्या पाणी फाउंडेशनच्या कामावर पार पडला. 

या आगळ्यावेगळ्या विवाह सोहळ्यास नवरा-नवरी बैलगाडीतून श्रमदानस्थळी आले होते. या विवाहाने महाराष्ट्रात नवीन पायंडा पाडला असून, यावेळी वºहाडी मंडळींनी ४० सीसीटी खोदल्या. यामध्ये दीड लाख लिटर पाणी (पंधरा टँकर पाणी) पावसाची साठवणूक होणार आहे. यावेळी नवरा-नवरीसह वºहाडी मंडळींनी ४२ अंश सेल्सिअस तापमानात देखील श्रमदान केले. या निमित्ताने दोन परिवारांचे जलसंधारणाबरोबर मनसंधारणाचे काम झाले. गाव पाणीदार करण्याचे ध्येय ठेवून लोधवडे (ता. माण, जि. सातारा) या ठिकाणी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या प्रशिक्षणासाठी ग्रामस्थांसह कुमार चव्हाण गेले होते. स्पर्धेचे काम चालू असताना त्यांचा विवाह ब्रह्मपुरी (ता. मंगळवेढा) येथील अमृता भाऊराव देशमुख यांच्याशी ठरला.

पाणी फाउंडेशनचे काम चालू असल्याने याच ठिकाणी विवाह करण्याची इच्छा नातेवाईकांना बोलून दाखविली. मुलीकडील मंडळींनीही या विवाहास होकार कळवत दुष्काळ मुक्तीसाठी लढत असलेल्या कुटुंबीयांना साथ देण्याचे ठरवले. कोणताही बडेजाव न करता विवाहानिमित्त होणारा वायफळ खर्च टाळत श्रमदान हाच आहेर म्हणून व्हॉट्सअ‍ॅपवर नातलग, मित्रमंडळी यांना विवाहाचे निमंत्रण पाठविण्यात आले होते. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब साठे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सुहास पाटील, पश्चिम महाराष्ट्र मास्टर ट्रेनर ज्योती सुर्वे, मराठा सेवा संघाचे दिनेश जगदाळे, रोटरी फाउंडेशनचे डॉ. सुभाष पाटील, डॉ. संदीप टोंगळे, तालुका समन्वयक राजकुमार माने, सुशांत गायकवाड, टेक्निशियन चेतन जाधव अजिंक्य पवार, सुप्रिया जंगले, सामाजिक प्रशिक्षक वसीम शेख, प्रतिमा सूर्यवंशी यांनी परिश्रम घेतले. पाणी बचती सारखा सामाजिक संदेश देत आगळावेगळा विवाह सोहळा केल्याचा आनंद होत असून स्पर्धा संपेपर्यंत आम्ही श्रमदान करणार असल्याचे नववधू अमृताने सांगितले.

मिलके एक साथ दुष्काळाशी दोन हात...नवरा-नवरीचे श्रमदान चालू असल्याचे पाहून वºहाडी मंडळीदेखील टिकाव, खोºया, पाट्या हातात घेऊन श्रमदानासाठी पुढे सरसावल्याचे चित्र दिसले. विवाह करण्याअगोदर छत्रपती शिवाजी महाराजांची आरती म्हणून जयघोष करीत बोलो मिलके एक साथ दुष्काळाशी दोन हात अशा घोषणा देण्यात आल्या. जामगावचे सरपंच सुहास पाटील व ब्रह्मपुरीचे सरपंच विजयसिंह पाटील या दोन्ही गावच्या सरपंचांनी सपत्नीक श्रमदान केले. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब साठे यांच्याकडून दहा हजार रुपयांची रोख मदत पाणी फाउंडेशनसाठी देण्यात आली. श्रमदान हाच आहेर म्हणून वºहाडी मंडळींकडून श्रमदान करून घेण्यात आले. पाणी अडवण्याचे महत्व सर्वांना समजले पाहिजे यासाठी वेगळ्या पद्धतीने विवाह करण्याचा निर्णय घेतला असल्याचे नवरदेव कुमार चव्हाण यांनी  सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धाmarriageलग्नdroughtदुष्काळ